९.२.१९
प्रति चि. पिंकीस, कालच तुझ्या बाबांना हॉस्पिटलमध्ये भेटून आलो. आय.सी.यु. मध्ये ठेवलं असलं तरी काळजीचं कारण नाही असं डॉक्टर म्हणत होते. शुगर बीपी आणि मानसिक ताण एकत्र आल्यामुळे क्रिटिकल झालं होतं. हळुहळू सुधारेल. तुला गिल्टी वाटणं स्वाभाविक आहे, पण त्याच्या आजारामुळे तो अत्यवस्थ झाला. तुझा प्रश्न तर आहेच. या सगळ्यात तुझ्या आईची अवस्था केविलवाणी झाली आहे. इकडे आड आणि तिकडे विहीर. तिनेच मला काहीतरी मार्ग काढण्याची गळ घातलीये. माझीही अवस्था फार वेगळी नाही. तू काकापेक्षा मला मित्रच जास्त समजते. मला ते आवडतंही. तुझ्या आईला वाटतं की मी तुला समजवावं. मला ते मान्य नाही. तो तुझ्यावर अन्याय होईल. तुझ्या विवेकाला पटेल तोच निर्णय तू घ्यावा या मताचा मी आहे. तू ठरवलेल्या आंतरजातीय विवाहाला संमती द्यावी की नाही हा प्रश्न आहे. या प्रश्नावर मत बनवून मला तुझे बाबा अन तू यापैकी एकाच्या पारडयात मत टाकायचं आहे. एका अर्थी न्यायाधिशाचा डगला अंगावर चढवायचा आहे. जगात कुणावरही अन्याय न करता न्याय करणे की सगळ्यात अवघड गोष्ट आहे, असं कुठेतरी वाचलं होतं. आता ते जाणवतय्. तुला आठवत असेल, पिढीवर चर्चा करताना मी तुला म्हणालो होतो, आमची पिढी म्हणजे बदलांच्या बळींची पिढी. आता पुन्हा एकदा एक मोठा बदल आ वासून माझ्या मित्राचा बळी मागतोय. तो तसा किती साधा आहे हे तुला सांगणं नको. साधं वर्तमानपत्रसुद्धा गांभीर्यानं न वाचणारा. ‘धोपट मार्ग सोडून नको’ हा आदेश मनाशी घट्ट धरून चालणारा. आपल्या माणसाला तो आहे तसा आपण स्वीकारत असतो म्हणून तर तो आपल्याला आपलं समजत असतो नाही का? हे जर मान्य केलं तर तो आहे तसा म्हणजे त्याच्या जपलेल्या धारणांसहित त्याला स्वीकारलं पाहिजे. आणि ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
अवांतर
, मनोज महाजन
, पत्रलेखन
, मुक्तस्त्रोत
Pramodsm
6 वर्षांपूर्वीजरी पिंकी चे पालक विरोध करत आहेत असा विचार केला तरी सुद्धा तो विरोध नसून त्यांना तिच्या बद्दल वाटणारी काळजी आहे हे पहिल्यांदा पिंकीने लक्षात घेतले पाहिजे. दुसरीकडे ही गोष्ट लक्षात घेतली पाहीजे की आपल्या होणाऱ्या नवर्याला ही गोष्ट समजून सांगितली पाहीजे. म्हणजे पहिल्यांदा नवरा आणि पिंकीचे पालक यांच्या मध्ये (लग्न झालं तर) तेढ रहाणार नाही . मग तिच्या लक्षात येईल की ही होणारा नवरा आणि पिंकी या दोघांनी मिळून फक्त पालकांना एवढंच पटवून द्यायचे आहे की पिंकी is in safe hands.
sumansons
6 वर्षांपूर्वीएकदम बरोबर आहे ,पण पिकी चे वडील सुध्दा तेवढेच समजूतदार पणा दाखवतील का तिचे।मत समजून घेतिल का? - सैा. पल्लवी ( ही अपल्या प्र ति क्रीयेवर ची प्र ति क्रीया अ ा हे )
avthite
6 वर्षांपूर्वीपिंकीला स्वातंत्र्य देतानाच तिच्या वडिलांनी तिला स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरक समजावून सांगणे आवश्यक होते.. शिवाय मूलतः आपली पिंकी तितकी समजूतदार आहे का हे पण आधीच पाहून मग हे स्वातंत्र्य तिला द्यायचे की नाही हा विचार बाबांनी करणे गरजेचे होते.. आणि ती तितकी समजूतदार असेल तर अर्थात तिला स्वातंत्र्य बरोबर जबाबदारी येते हे ही कळले असेलच.. आणि त्यातूनही तीनेहा निर्णय घेतला असेल तर तो बाबांना समजावणे हे तिचे कर्तव्य आहे. यात कुठेही नाही हे उत्तर असेल अथवा शंका असेल तर पिंकी ने आणि तिच्या बाबांनी नीट विचार वा चर्चा करून मगच निर्णय घ्यावा.. कारण निर्णयाचे परिणाम भविष्याला आकार देत असतात.. आणि हा आकार चुकू नये इतकीच अपेक्षा आहे.
sumansons
6 वर्षांपूर्वीधन्यवाद!
Shyam
6 वर्षांपूर्वीआपल्या चालीरीती , खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी , राजकीय विचारसरणी , दोन्ही घरातील माणसे आधुनिक विचारांची आहेत का ह्या सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घ्यावा . शेवटी निर्णय वधू आणि वर यानीच घ्यायला हवा .
Smita
6 वर्षांपूर्वीआज च्या काळात ही वादा चा होऊ शकणारा विषय आहे ... केवळ आंतरजातीय च नव्हे तर भौगोलिक अंतर जास्त असणाऱ्या कुटुंबामध्ये ही मुलीला लग्न।नंतर खुप adjustments कराव्या लागतात ... मग बऱ्याच वेळा आई वडिलाना त्रास नको म्हणून मुलगी सर्व सहन करते ... या मध्ये नवऱ्याचा support असेल तर गोष्टी जरा सुसहय
deepa_ajay
6 वर्षांपूर्वीआंतरजातीय विवाह हा खचितच वादाचा विषय आहे, मला वाटत ह्या विषयावर एक लेख पण आलाय, मुलगा कितीही चांगला असला तरी खरी तारेवरची कसरत मुलीला करावी लागते, आता प्रश्न हा आहे की मुली ची किती मानसिक तयारी आहे, कारण लग्न तर होईल पण पुढच आयुष्य संसार सांभाळणे ही तिची खरी कसोटी असेल त्यात ती किती टिकेल ह्यावर सगळं अवलंबुन आहे
pjanaokar
6 वर्षांपूर्वीFarach Chan.
arkpune
6 वर्षांपूर्वीमला वाटते सुवर्णमध्य काढावा व पिंकीने आई बाबांना हा जोडीदार मी का निवडला याची प्रबळ कारणे सांगावी .
krmrkr
6 वर्षांपूर्वीआज पिंकी व तिचे बाबा,आई आणि व्हेटो वापरू शकणारी आजी या सगळ्या कुटूंबाचा आहे. पण उद्या पिंकी आणि ती निवडेल त्या जोडीदाराचा आहे.पिंकी सज्ञान असावी असे गृहीत धरले तर तिच्या निर्णय प्रक्रियेत इतरांची साथ असावी. मुले मोठी झाल्यावर त्यांनी त्यांचे निर्णय घेणे आणि कुटूंबाने त्यांना मानसिक बळ देणे आवश्यक आहे. पिंकीच्या बाबांची प्रकृती उपचारांनी ठीक होईलच.पण नंतरही त्यांना मानसोपचाराची मदत घ्यावी लागेल .
Aaidada
6 वर्षांपूर्वीवडिलांनी च बदलायला हवे कारण मनाविरुद्ध त्या मुलीचे लग्न लावून तिच्या भावी आयुष्याचा जुगार कशाला खेळायचा? तीचा आनंद तोच आपला आनंद