मूर्ख माणूस!

२५ मार्च हा व.पु. काळे यांचा जन्म दिवस. आज वपु असते तर ते ८७ वर्षांचे झाले असते. खरंच? काळाच्या संदर्भात ते खरे असेलही परंतु वपुंच्या लिखाणाच्या संदर्भात आपल्याला आनंद मधल्या ‘आनंद कभी मरा नही करते’ या संवादाच्या धर्तीवर ‘वपु कभी आऊटडेटेड हुवा नही करते’ असं म्हणावं लागल.मग  ८७ हा केवळ एक आकडा ठरतो. वपुंचे लेखन बुढ्ढीके बाल सारखे जीभेवर असताना आनंद देणारे आणि काही क्षणांत विरघळून जाणारे. ते जीभेवर असण्याचा काळ नेहमी कमीच राहणार. प्रस्तुतची कथाही वपुंच्या त्याच शैलीत आणि तसाच आनंद देणारी. जीभेवर सुविचारांचा गोडवा ठेवून जाणारी…

**********

“मूर्ख माणसाची गाठ पडली तर काय करावं?” हा माझा प्रश्न.

“त्याला टाळावं.”

“त्याला तो किती मूर्ख आहे हे पटवून द्यावं.”

“मूर्ख म्हणून सोडून द्यावं.”

“एक झापड मारावी.”

“अशा माणसाला मुद्दाम पार्टीला बोलवावं आणि त्याच्या मूर्खासारख्या वल्गना ऐकाव्यात. म्हणजे वेगळी करमणूक लागत नाही.”

प्रश्न एक.

उत्तरं अनेक. सुरेश भट म्हणतात त्याप्रमाणे,

‘एक साधा प्रश्न माझा. लाख येत उत्तरे, हे खरे, की हे खरे, की हे खरे, की हे खरे.’

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 8 Comments

 1. वेगळी कथा असे लोक आपल्याला का नाही भेटत असे वाटले वाचून 👌👍🙂

 2. लेख छान आहे.

 3. जरा उशीरच झालाय नाही? आणि ही कथा इतरत्र आलेली नाही? काहीही काय? क्षमस्व. पण ते लंपनच्या भाषेत ते काय म्हणतात ते, म्हणजे आपण ते काय ते वपु पुरेसे अनुभवलेले दिसत नाहीत… 🙂 पहा: कथा: टी टी, पृ. १२७-१३१, चिअर्स, व. पु. काळे, १९८४. मेहता, पुणे. थोपु (fb) वर दोन-तीन उत्तम ग्रुप्स आहेत. व.पु.च्या वाढदिवशी मीच ‘रंगपंचमी’चा परिचय करून दिला आहे. नक्की सामील व्हा, आणि वाचा…

 4. जगातला सर्वात सुखी माणूस हा टीटी सारखाच मूर्ख असावा…!!!

 5. खूप आवडली कथा…. वपुंची खूप पुस्तकं, कथा वाचल्यात…. पण ही नव्हती वाचली. धन्यवाद

 6. लिखाण वेगळाच आनंद देऊन गेला. एखाद्या सुवासिक फुलासारखा..

 7. सुंदर लेख

 8. जबरदस्त…..
  ह्या कालनिर्णय वाल्या साळगावकरांचे आभार मानावे तितके कमीच. अहो, काय काय साहित्य त्यांनी कालनिर्णय च्या रूपाने देउन ठेवलंय ‌.
  ते असो. पण तुम्ही अगदी हुडकून काढून काही ना काही चांगलं देत असता. तुमचेही मनापासून आभार….

Leave a Reply

Close Menu