२५ मार्च हा पत्रकार-संपादक गणेश शंकर विद्यार्थी यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्तानं पत्रकार सुनील तांबे यांनी मुंबई सर्वोदय मंडळामध्ये केलेलं हे भाषण... भारत वा हिंदुस्थान नावाची संस्कृती प्राचीन काळापासून आहे. मात्र भारतीय राष्ट्र-राज्याची निर्मिती ब्रिटिशांचं राज्य इथे स्थिरावल्यानंतर होऊ लागली. अगदी नेमकेपणाने सांगायचं तर प्लासीच्या लढाईनंतर गंगा-यमुना खोर्यात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य स्थापन झाल्यानंतर. म्हणजे सुमारे १७५७ नंतर. या काळात कोलकत्ता, मद्रास, मुंबई, लाहोर या शहरांमध्ये नवा मध्यमवर्ग निर्माण झाला. हा मध्यमवर्ग अतिशय छोटा होता, इंग्रजी भाषेमध्ये परस्परांशी संवाद करणारा होता. मात्र या मध्यमवर्गाने भारतीय राष्ट्र-राज्य म्हणजे काय, कोणाचं, कशासाठी असे प्रश्न उपस्थित केले. या मध्यमवर्गाला १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्यसंग्रामाचं वा ब्रिटिश राजवटीच्या विरोधातील बंडाचं विशेष कौतुक नव्हतं. या बंडामध्ये राष्ट्रीय चेतना अवश्य होती, मात्र नव्या भारताची दृष्टी नव्हती. भविष्यातील भारत कसा असावा, त्याचा राज्यकारभार कसा चालावा, यासंबंधात १८५७ च्या लढ्याचं नेतृत्व करणार्यांनी विचार केलेला नव्हता. भारतीय राष्ट्र-राज्य भारतीय उपखंडातील (श्रीलंका आणि म्यानमार वगळता) सर्व लोकांचं असेल. धर्म, जात, वंश, भाषा, प्रांत याच्याशी त्याचा संबंध नाही. मात्र ही सर्व विविधता सामावून घेणारं असेल आणि समाजातील तळातील व्यक्तीला अर्थातच दलित, शोषित, आदिवासी आणि अल्पसंख् ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Tush9890
5 वर्षांपूर्वीलेखकाने स्वतःच्या मनातील आकस लेखात ओकला हे हास्यास्पद आहे. तांबे साहेब माहिती द्या, ज्ञान देऊ नका.
vrudeepak
6 वर्षांपूर्वीहुतात्मा गणेश शंकर विद्यार्थी यांच्या जीवन कार्याचा परिचय करून देणारा श्री तांबे यांचा हा लेख छान वाटला. लेखात सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल टिप्पणी करताना वाचकाच्या विचाराला चालना देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. सध्याच्या राजकीय वातावरणात आपण एकाच विचारसरणीचा उन्माद पहात आहोत. सर्वसमावेशक विचारांपासून आपण दूर जात आहोत असे वाटते.
prashantlawand
6 वर्षांपूर्वीthe wire and druv, really?
Sunanda
6 वर्षांपूर्वीसाक्षेपी लेखाबद्दल श्री. सुनील तांबे यांचे अभिनंदन.