पिंकीस पत्र - भाग दुसरा

पुनश्च    मनोज महाजन    2019-04-08 19:00:13   

दि. १०.३.१९ प्रति, चि.सौ.का. पिंकीस, तुला पिंकी म्हटलेलं आवडत नाही, हे मला माहित आहे. काय करणार तू माझ्या डोळ्यासमोर येते ती फ्रॉक घालून भातुकली खेळणारीच. मुलं कितीही मोठी झाली तरी नावाचं हे टोपण काही निघत नाही. मूळ नाव टोपणाखाली इतकं झाकलं जातं की ते आठवतच नाही. पूर्वी नवसानं झालेल्या अपत्याला दृष्ट लागू नये म्हणून त्याला तिरस्करणीय विचित्र नावं ठेवली जात, जसे दगड्या, धोंड्या ,धोंडाबाई, कचऱ्या, केराबाई ही टोपणनावच पुढं काळाच्या ओघात पिंट्या आणि पिंकी झाले आणि टोपण नावाची परंपरा चालू राहिली. परंपरेचा एक अदृश्य चिवट धागा माणसासोबत असतोच.  कितीही मोठा झाले तरी आपल्या मुलांना टोपण नावाने किमान खाजगीत हाका मारायची देखील परंपराच. या परंपरेचा एक पाईक म्हणून तू माझ्यासाठी पिंकीच्! खरं म्हणजे आताही घडलं ते या परंपरेच्या धाग्याशीच. तंत्रज्ञानाच्या जबरदस्त धक्क्यात खरंतर काळ दुप्पट तिप्पट वेगाने पळतोय, त्यामुळे आपल्यातलं अंतरही वाढतय. अंतर किती तर गंगेच्या या तीराला मी तर त्या तीराला तू.  मधली गंगा स्वच्छ झालीये हेही  प्रतिकात्मकच. दोन टोकावर आपण असूनही आज आपला संवाद होतोय.  तू मला काका म्हणून मान देतेस अन् मला तुझ्याबद्दल पुतणी म्हणून ममत्व वाटतय.  हीही परंपरेची देणगी.  कुठलाही आडपडदा न ठेवता निर्भयपणे तू आपल्या आवडलेल्या जोडीदाराची निवड जाहीर केलीस आणि हा जोडीदार परजातीतला आहे, याचीही स्पष्ट कल्पना दिलीस. ही निर्भयता मात्र तुझ्या काळाची देणगी.तुझी बाजू तू तुझ्या बाबांना , त्यांच्या भावना व जेष्ठत्वाचा आदर राखत पटवून दिलीस. ह्यात तुला बहुविध.कॉमवरच्या सल्ल्याचाही उपयोग झाला हे तू आर्वजून सांगीतलस.काहीही असो शेवट गोड झाला! प्रेम लाभणं हे भाग्याचं, ही कल्पना पूर् ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


अवांतर , पत्रलेखन , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.