काही महिन्यांपूर्वी प्रकाशित झालेल्या " ठग्ज अॉफ हिंन्दुस्थान " चित्रपटामुळे अठराव्या शतकात भारतामधे इंग्रजांना आणि प्रवाशांना सळो की पळो करुन सोडलेल्या ठगांची कथा आली आहे.चित्रपटातील कथा जरी काल्पनिक आणि मसालेदार असली तरी जनरल फिलीप टॉयलर ने १८३९ मधे लिहलेलं " Confessions of a Thug " हे पुस्तक ही मसालेदार म्हणावं असंच आहे,या पुस्तकाची भाषांतरे अनेक भाषांमधे झाली,मराठीमधे वरदा प्रकाशनाने "ठगांची जबानी " या नावाने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे.
ठग म्हणजेच डाकू ज्यांच्या अनेक कथा मध्य भारतातील ग्रामिण भागात आजही चवी चवीने सांगितल्या जातात, अर्थात अठराव्या शतकातील हे ठग आणि चंबळचे डाकू यांच्यात गल्लत करता कामा नये , चंबळचे डाकू हे अतिरक्तरंजित अशा हत्याकांडा साठी प्रसिद्ध आहेत तर जनरल फिलीप ज्या ठगांबद्दल बोलत आहे ते मात्र रक्त न सांडवता धोक्याने मारुन प्रवाशांचं सामान लुटणारे लुटारु होते. चंबळचे डाकू आणि हे ठग यांच्यात एक समान धागा म्हणजे हे दोन्ही ही दुर्गा देवीचे परम् भक्त .
काही इतिहास आणि समाजशास्त्राचे अभ्यासक मानतात की इंग्रजांमुळे संस्थानिक आणि मांडलिक राजांना आपल्या सैन्यात मोठी कपात करावी लागली यामुळे बेकार झालेले हे सैनिक उपासमामुळे हैरान झाले, या सैनिकांनामधे लढाई सोडून इतर व्यावसाईक कौशल्यांच आभाव, यातूनच काही जण पुढे डाकू झाले आणि मग उभ्या राहिल्या डाकूंच्या टोळ्या ! पण ठगांच्या बाबतीत अशी काही उदाहरणे सोडता ते परंपरेने हा व्यवसाय करत असल्याचं समोर आलं आणि मग इंग्रजांनी गुन्हेगार जातींची एक यादीच तयार केली आणि त्यांच्या विषयी बरीच माहिती गोळा करायला सुरुवात केली.
ठगांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी देशभर प्रवाशांच्या आणि व्यापार्यांच्या हजारो हत्या केल्या पण या हत्या करण्यामागे त्यांनी अजिबात रक्त न सांडवता करण्याचं धोरण दिसून येतं ! उदा. यातील अनेक हत्या रुमालाने गळा आवळून आणि नाक दाबून केल्याचं आढळतं ! अशा हत्या करण्यामागे त्यांची एक अंधश्रध्दा होती ,या अंधश्रध्दे मागे कथा होती दुर्गा देवी आणि अंधकासुराची ,काही प्रदेशात यात अंधकासुरा जागी रक्तांकुश ,रक्तबीज राक्षसाचं नाव येतं परंतु कथा मात्र सारखीच सापडते !
झालं असं की अंधकासुराला वरदान होतं की त्याच्या सांडलेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून नवीन अंधाकासुर जन्माला येईल,यामुळे देवांना काही त्याचा वध करता येईना, मग शेवटी दुर्गा देवीने आपल्या एका वस्त्राने अंधकासुराचा गळा दाबून वध केला . याच कथेची या ठगांच्या गळादाबून हत्या करण्या मागे प्रेरणा होती.गळा दाबून मारल्यास कोणतेही पाप लागत नाही आणि रक्त सांडल्यास हत्येचे पाप लागते अशी त्यामागे त्यांची श्रध्दा होती.
लेखक- प्रणव पाटील
अंधकासुर आणि दुर्गापूजक ठग !
निवडक सोशल मिडीया
प्रणव पाटील
2021-08-06 10:00:02
Varsha Sidhaye
4 वर्षांपूर्वीKHUPCH CHHOTA LEKH . APEKSHABHANG !
Hemant Marathe
4 वर्षांपूर्वीथोडक्यात माहिती दिली आहे. या विषयावर सविस्तर लेखन अपेक्षित
Ratnakar
6 वर्षांपूर्वीखुप छान माहिती, मागील महिन्यातच एका thagachi जबानी हे confessionof a thug चे भाषांतरित पुस्तक वाचले असल्याने विषय मनात ताजा होता