उध्दवराव नुसते तळमळत होते. त्यांचा संपूर्ण उजवा पाय गेला आठवडाभर दुखत होता. रश्मी वहिनींची झोप उडाली होती कारण रात्रभर उद्धवरावांचे पायोपचाराचे प्रयोग सुरू होते. कधी ते पायाखाली उशी घेत, तर कधी उशीवर पाय घेत. कधी गरम पाण्याचा शेक घेत तर कधी बर्फाचा खडा रूमालात बांधून त्याने पाय शेकत. कधी गुडघ्याला क्रेप बँडेज बांधत तर कधी पोटरीला बँडेज बांधून घेत. हे सगळे अर्थातच रश्मी वहिनींच्या मदतीने सुरू होते, त्यामुळे त्यांचीही झोप होत नव्हती. गेल्या शनिवारी रात्री अचानक उद्धवरावांच्या उजव्या पायाची टाच दुखायला सुरूवात झाली आणि रात्रभरात टाचेतले दुखणे पोटरीपर्यंत आणि तिथून कंबरेपर्यंत पसरत गेले. रविवारी सकाळी तर त्यांना पाय उचलणेही कठीण झाले. या गोष्टीला आता आठवडा उलटून गेला होता पण पायाचं दुखणं काही कमी होत नव्हतं. उध्दवराव नुसते तळमळत होते. नाटकातल्या व्यक्तिरेखेनं रंमंचावर अस्वस्थपणे इकडून तिकडे फिरावं तसे मिलिंद नार्वेकर हाताची घडी घालून फिरत होते. आदेश भाऊजींनी तर गेला संपूर्ण आठवडाभर घरातच तळ ठोकला होता. उध्दवरावांच्या पायाविषयी कळल्या कळल्या त्यांनी मातोश्रीवर धाव घेतली आणि येताना सिद्धिविनायकाचा प्रसाद, अंगारा आणि आशीर्वाद घेऊनच ते आले. तेलकट,तुपकट आणि गोड याची मनाई असल्यानं उध्दवराव लाडू वगैरे खातच नाहीत, पण प्रसादाला नाही कसं म्हणायचं म्हणून त्यांनी त्यातले बुंदीचे दोन दाणे खाल्ले. वहिनींनी अंगारा कपाळावर लावला पण काही उपयोग झाला नाही. आदेश भाऊजी दर अर्ध्या तासाने ‘बरं वाटतंय का आता?’ असं विचारत होते. जणू बरं वाटलं नाही तर सिद्धिविनायकाचा महिमा कमी झाल्याची अफवा पसरेल की काय अशी भीती त्यांना वाटत होती.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
amarpethe
7 वर्षांपूर्वीझकास
किरण भिडे
7 वर्षांपूर्वीअनंत जी, आपण ७ जानेवारीला पुनश्च चे सभासदत्व घेतलेत. ते वार्षिक सशुल्क सभासदत्व होते. त्याचे सभासद म्हणून तुम्ही पुनश्च वर प्रसिद्ध होणारे लेख वाचू शकता. पण तंबी दुराई हा सशुल्क ब्लॉग आहे जो दर रविवारी प्रसिद्ध होतो. त्याचे अतिरिक्त ५० रुपये भरून वार्षिक सभासद होऊ शकता. तुम्ही जो login चा प्रयत्न करताय तो पुनश्च वरील लेख वाचण्यासाठी? की तंबीचे? तंबीचे तुम्ही सभासद नसल्यामुळे login होणार नाही. पुनश्च वर login होत नाहीये? म्हणजे ७ जानेवारीनंतर तुम्ही आज पहिल्यांदाच प्रयत्न करताय login चा? कृपया कळवावे म्हणजे योग्य ती मदत करता येईल.
अनंत पालव
7 वर्षांपूर्वीसभासद होऊन देखील लेख वाचता येत नाहीत. ४ तास लाँगीन चा प्रयत्न केला. १००/- रु. फुकट गेल्याच दुःखा पेक्षा लेख वाचता येत नाहीत याचच सल जास्त आहे. कृपया नोंद घ्यावी .विनंती.
किरण भिडे
7 वर्षांपूर्वीनमस्कार. आपण ७ जानेवारी रोजी १०० रुपये भरून पुनश्चचे वार्षिक सभासदत्व घेतले आहे. त्यानुसार आपण पुनश्चवर प्रसिद्ध होणारे दर आठवड्याला २ लेख वाचू शकता. ते लेख पुनःप्रसिध्द असतात. तंबी दुराई हा ताज्या लेखांचा सशुल्क ब्लॉग आहे जो दर रविवारी प्रसिद्ध होणार आहे. त्याचे अधिकचे ५० रुपये आपणास भरावे लागतील जे आपण सभासद विभागातून भरू शकता. काही अडचण आली तर जरूर कळवा.
rushikeshgawade
7 वर्षांपूर्वीकृपया करून आपण लक्ष देऊन मला सदरील लेक वाचता यावा ह्या कमी मद्दत करावी
rushikeshgawade
7 वर्षांपूर्वीLogged in as rushikeshgawade Account Status Active Membership वार्षिक सभासद २०१७-१८ Account Expiry 31/12/2018
Prashant Jagtap
7 वर्षांपूर्वीI have successfully subscribe for your punnash app & tubing durai. Thanks for such excellent service in Marathi.
Prashant Jagtap
7 वर्षांपूर्वीI have successfully subscribe for your punnash app & tubing durai. Thanks for such excellent service in Marathi.
aparna kelkar
7 वर्षांपूर्वीसबस्क्राइब कसे करावे ते सांगा
vijaypatilrit
7 वर्षांपूर्वीI have already a register member.
किरण भिडे
7 वर्षांपूर्वीwww.punashcha.com/subscribe या लिंकवर जा आणि सशुल्क किंवा सशुल्क+तंबी असे सभासदत्व घ्या.
bookworm
7 वर्षांपूर्वीAchuk Nidaan! Chhan prahasan!
सूर्यकांत देशमुख
7 वर्षांपूर्वीhow to become a member how to subscribe please explain
सूर्यकांत देशमुख
7 वर्षांपूर्वीhow to subscribe आपले सभासद व्हायचे आहे ते कसे करायचे