आम्ही तर भाषण ऐकायला गेलोच नव्हतो. ऐकून त्यातले काही समजेल अशी शक्यताही नव्हती. आम्हांला फक्त गांधी पाहायचे होते. नजरभक्तीचा काळ होता तो. आणि मला शंका येते की आमच्यापेक्षा वयाने अधिक असलेल्या लोकांनाही नजरभक्तीचेच समाधान हवे होते. तेव्हा 'लाऊडस्पीकर' ही चीज नाशिकपर्यंत तरी पोचली नव्हती. त्यामुळे व्यासपीठापासून दूरवर असलेल्या श्रोत्यांनी आपल्या श्रोतेपणाचा अगोदरच राजिनामा दिलेला होता. त्यांनाही फक्त पाहायचे होते. श्रोतेपणा संपला आणि निर्भेळ प्रेक्षकत्व शिल्लक राहिले म्हणजे सभासमारंभात जो अद्भुत गोंधळ निर्माण होतो तो तेव्हाही झाला. सर्व जमावाला गती आली होती. प्रत्येक माणूस मागे, पुढे, डावीकडे वा उजवीकडे सामर्थ्यसंपन्न हालचाल करण्याच्या प्रयत्नात गुंतला होता. हजारो लोकांच्या परस्परविरोधी गतीमुळे सभेला आपोआपच एक अगतिकता आली आणि माणसे गुदमरू लागली. अशा रणधुमाळीत आम्ही- मी व माझे काही समवयीन आप्तमित्र- एरव्ही टिकलो नसतो. पण आमचा जो मुखिया होता तो असा कचदिल नव्हता. गर्दी हे त्याच्या दृष्टीने स्वीकारले व तोडले पाहिजे असे आव्हान असायचे. या सेनानायकाने आपल्या सेनेतील कोणाचा हात, कोणाचा कोट, कोणाची मान धरून त्याला व्यासपीठाच्या दिशेने ओढायला सुरुवात केली. गर्दीचा एक विख्यात स्वभाव आहे. तुम्ही झोटिंगाच्या अवसानात जोरकस हालचाल वा आरडाओरड केली तरच ती दुभंगते. स्नेहशील अनुनयाने तिची पाटी फोडता येत नाही. आमच्या नायकाजवळ हे तंत्र होते. कोठल्यातरी पौराणिक कथेमध्ये दैत्यांच्या मागे लागलेल्या मुसळांप्रमाणे आम्ही जमावातून मुसंडी मारली व व्यासपीठापासून पंधरावीस फुटांपर्यंत जाऊन पोचलो.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Smita Kunte
12 महिन्यांपूर्वीएका अलौकिक व्यक्तिमत्वाने दुसऱ्या अलौकिक व्यक्तिमत्वाबद्दल केलेले लिखाण. काय असेल तो भारावणारा अनुभव.. ! कल्पनाच करू शकत नाही. बहुविधचे खरंच आभार..
Hemant Marathe
12 महिन्यांपूर्वीअतीशय सुंदर भाषेमध्ये केलेले लिखाण
Niranjan Joshi
12 महिन्यांपूर्वीBahividhche anek anek aabhaar