या समद्या बाया आसराच होत्या
संतोष आळंजकर
ते ओसाड
काटेरी बाभळीचं जाळवण दिसतंय ना!
तिथून आत शिरलं की
जीर्ण दगडी पायऱ्यांनी आपण उतरत जातो
खोल खोल...बारवेच्या तळाशी
तिथे साती आसरा रांगेत मंडून बसल्याय
मोठ्या काळपट शिळेवर
आसराच्या आजूबाजूला दिसतील तुम्हांला
हिरव्या बांगड्यांचे तुकडे
पावन झालेल्या नारळाच्या नरोट्या
कणकीचे वाळलेले दिवे
अर्धवट जळालेल्या कापूसवाती
कोवळ्या केसांचे पुंजके
आणि दगडावर ओढलेल्या
हळद-कुंकवाच्या रेघोट्या...
या बारवे शेजारच्या
गावपाणोठ्याच्या विहिरीला
तळातून पडलंय एक मोठ्ठे अंधारी भगदाड
जे घेऊन जातं साती आसराजवळ
म्हाताऱ्याकोताऱ्या बाया म्हणतात—
'आसराचं आसराला बलावणं आलं की
टाळता येत नै कोणालाबी!
न्हात्याधुत्या पोरींना तं हुक्मं बलवत्यात
या पाणोठ्याच्या येहरीत पाय घसरून पडलेल्या
त्या समद्या बाया आसराच होत्या!'
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .