कमळगंध


"भाईला कांदेपोहे आवडतात. पोहे करायचे असतील तेव्हा त्या जिभल्या फणसाकडेचा तो सिगापुरी माड दिसतोय ना? त्याचा नारळ खवणायचा. शहाळी या बावीकडच्या माडाची उतरवतात. मोदकाला नारळ ते रांगेत सात माड दिसतायत ना? त्यातला कोणता पण चालतो. ही पपनिशीण जरा आंबटोळी आहे, आडीतली गोड आहे. ती भाईला आवडते. बाकी इथलं तसं काही भाईला आवडत नाही. नानी काही ना काही करत राहते त्यांच्यासाठी पण आता आमचे भाई पहिल्यातले राहिले नाहीत."

यमनी असं बोलून मला काही सुचवत राहायची. पण आपण यात संशय घेऊन अस्वस्थ नाही व्हायचं, असलं काही मला ठरवायला लागलं नाही. कारण त्यात संशय घेण्यासारखं काही नव्हतंच. जे काही होतं ते स्पष्ट दिसत होतं आणि हे काही जगावेगळ इथे प्रथमच घडलंय असं नव्हतं. हे असं घडत आलं आहे. यमनी मात्र आजही त्यातच गुंतलेली आहे. यात ती चूक की बरोबर? हा विचार मी करून उपयोग काय?

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen