अंक : महा अनुभव, ऑक्टोबर २०२१
लेखक : लुईस लोपेझनिएवेस
अनुवाद : कल्पना भागवत
११ ऑक्टोबर १४९२ या दिवशी रात्री नऊ वाजता कोलंबस सांता मारिया या जहाजाच्या प्रमुख डोलकाठीवर चढला. त्याने आपल्या उजव्या बाहूभोवती एक जाड दोर गुंडाळून घेतला, तोल जाऊ नये म्हणून, अन् अंधुकपणे दिसणार्या क्षितिजावर नजर खिळवली. पूर्ण चंद्र आकाशात नव्हता, तरीदेखील दुपारभर पूर्ण प्रखरतेने तळपलेल्या सूर्याचे अवशेष अजूनही हवेत तरंगत होते अन् त्यामुळे समुद्राच्या सौम्य अन् शांत लाटा त्याला दिसू शकत होत्या. त्या जागी तो ४५ मिनिटं टिकून होता. त्या अवधीत त्याने क्वचितच मान हलवली असेल वा डोळे बंद केले असतील
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .