अंक : महा अनुभव, ऑक्टोबर २०२१
लेखक : गाब्रिएल गार्सिआ मार्केझ
अनुवाद : कल्पना भागवत
सोमवार उजाडला तोच मुळी कोमट, उदास, बिनपावसाचा. श्रीयुत औरेलिओ एस्कोबार... व्यावसायिक पदवी नसलेला दंतवैद्य. पहाटे लवकर उठणारा.. सहा वाजताच त्याने आपलं क्लिनिक उघडलं. काचेच्या कपाटातून प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या साच्यात बसवलेली कृत्रिम दातांची कवळी बाहेर काढून ठेवली. हाताच्या पकडीत मावतील एवढी साधनं, अवजारं टेबलावर ठेवली. आकाराने मोठ्यापासून लहानापर्यंत ओळीने ठेवली- प्रदर्शनात ठेवल्यासारखी.. त्याने उभ्या रेघांचा शर्ट घातला होता. कॉलर नसलेला, सोनेरी बटणांचा, गळाबंद... अन् इलॅस्टिक पट्ट्यांनी सावरून धरलेली पँट. ताठ, हडकुळा... चेहर्यावरचे भाव क्वचितच परिस्थितीनुरूप असायचे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
महा अनुभव
, ऑक्टोबर २०२१
, कथा
कथा