चित्रस्मृती - सिनेमा हिट झाला आणि चरित्र नायक 'हीरो ' झाले.....

रुपवाणी    दिलीप ठाकूर    2021-03-23 15:44:53   

आपल्याकडच्या सिनेमाच्या जगात यश म्हणजेच बरेच काही असते. बरेच काही घडवते आणि म्हणूनच तेथील छोट्या मोठ्या गोष्टीना सतत न्यूज व्हॅल्यू आहे. ( त्यात प्रत्येक वेळी न्यूज असायलाच हवी असा काहीही नियम नाही. ) त्याचं काय झालं, ब्रीज सदनाह निर्मित आणि दिग्दर्शित 'व्हीक्टोरिया नंबर २०३'( रिलीज १९७२ ) हा गुन्हेगारीपट रितसर रिलीज होत असताना वृत्तपत्राच्या जाहिरातीत प्रथेप्रमाणे अशोककुमार, नवीन निश्चल, सायरा बानू, अन्वर हुसेन, रणजित आणि प्राण अशा क्रमाने  नावे दिली गेली.   

वृत्तपत्रापासून इलेक्ट्रीक खांबापर्यंतच्या, अगदी रेल्वे स्टेशनवरच्या जाहिरातीतही असेच प्राधान्य होते. म्हणजे, नवीन निश्चल व सायरा बानूला जास्त स्पेस. ( नवीन निश्चलची त्या काळात चक्क चलती होती. उगाच नाही, त्या काळातील टॉपच्या अॅक्ट्रेस त्याच्या नायिका होत्या). सिनेमाचा पहिला शो सुरु झाला तोच राजाच्या भूमिकेतील अशोककुमार आणि राणाच्या भूमिकेतील प्राण यांच्यावरील 'दो बेचारे बिना सहारे देखो पुछ पुछ कर हारे ' या गाण्याच्या क्रेझने! 

 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


रूपवाणी , चित्रपट रसास्वाद
रसास्वाद

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर [email protected] या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.