आपला सिनेमा त्यांचा सिनेमा


  सिनेमा नावाचे वर्षानुवर्षे लोकांचे मनोरंजन करणारे, प्रबोधन करणारे, त्यांना कलात्मक आनंद देणारे माध्यम, असं काही वादळ उठवू शकेल असा विचार कोणी केला नसावा. भूतकाळात डोकावून पाहिले तर लक्षात येते की सिनेमांनी सनसनाटी निर्माण केली नाही, एखादा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यावर बंदी घालावी, त्याचा निषेध करावा, अशी प्रकरणे घडलीच नाहीत असे नाही. आणीबाणीच्या काळात राजकीय विधाने करणाऱ्या, राजकारणी लोकांचे चित्रण करणाऱ्या काही चित्रपटांवर आणि नंतरच्या काळात हिंसाचाराचे, समलैंगिकतेचे चित्रण करणाऱ्या चित्रपटांवर कधी सेन्सॉरकडून तर कधी कडव्या सामाजिक संघटनांकडून बंदी घालण्यात आली आहे. पण एखादा सिनेमा पाहायलाच हवा, तो नाही पहिला तर आपण फार मोठा गुन्हा केला आहे अशी तीव्र जाणीव करून देणारी परिस्थिती निर्माण करण्याचे प्रसंग घडले नव्हते. आज फोफावलेल्या समाजमाध्यमांचा यात मोठा सहभाग  आहे यात शंकाच नाही पण त्याच बरोबरीने चित्रपटासारख्या वैश्विक भान देणाऱ्या कलामाध्यमाला संकुचित करण्याचा काही कलाबाह्य समूहाकडून जाणीवपूर्वक होत असलेला प्रयत्न संवेदनशील प्रेक्षकासाठी क्लेशकारक आहे.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


Contemporary Indian Cinema , Jhund , Kashmir Files , Pawankhind

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen