२५ जानेवारी, पुनश्चमित्र मेळावा, पुणे

संपादकीय    संपादकीय    2020-01-24 09:50:19   

नमस्कार मंडळी, तांत्रिक अडचणी आणि त्याही ऐन मोक्याच्या वेळी आल्या की ' मर्फीज लॉ ' आठवतो. :) उद्या म्हणजे शनिवारी सकाळी १० ते १२ या वेळेत 'पुनश्च-मित्र' मेळावा पुण्यात ठरवला. तसे मेसेजेस सगळ्यांना पाठवले. येणाऱ्या मित्रांच्या संख्येचा अंदाज घेऊन आणि कोथरूड सर्वाना तुलनेने मध्यवर्ती पडेल, म्हणून त्या अनुषंगाने ठिकाण ठरवले. आणि नेमकं ते कळवायच्या आधी आमच्या ऑफिसच्या फोनचं व्हॉट्सअॅप अचानक बंद झालं. सगळे कॉन्टॅक्ट्स आणि ब्रॉडकास्ट लिस्ट्स त्यामध्येच आणि जोवर व्हॉट्सअॅप रिकव्हर होत नाही तोवर त्यांचा अॅक्सेस नाही. :( मिळतील तेवढ्या कॉन्टॅक्ट्सना दुसऱ्या नंबर वरून मेळाव्याचा पत्ता कळवला. पण किती जणांपर्यंत तो पोहोचला असेल याबद्दल साशंक आहोत. त्यासाठी आपल्या पोर्टलवरून आणि फेसबुक पेजवरून तो कळवत आहोत. पुण्यातील सर्व सभासद व वाचकांना नम्र विनंती, की त्यांनी खालील क्रमाकांवर कॉल करून आपली उपस्थिती आगाऊ सांगावी, जेणेकरून व्यवस्था करणे सोयीचे होईल. ९१५२२५५२३५ ९८३३८४८८४९ *** पुनश्चमित्र मेळावा, पुणे दिनांक - २५ जानेवारी ( शनिवार ) सकाळी १० ते १२ पत्ता - स्वप्नील कुलकर्णी ६, प्रोफ़ाईल निम्बस ९७, मयूर कॉलनी हॉटेल करी लिव्हज च्या बाजूला कोथरूड, पुणे


प्रतिक्रिया

  1. किरण भिडे

      5 वर्षांपूर्वी

    https://bahuvidh.com/editorial/15989 हा काय...

  2. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    लेख कुठे आहे?



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen