खुशखबर एकल सभासदत्वाची

संपादकीय    संपादकीय    2021-05-05 08:02:00   

सध्या आजूबाजूला लसीकरण आणि निवडणूक निकालांची धुमश्चक्री चालू असली, तरी वाचनप्रेमींनी गेल्या महिन्यातली ही बातमी वाचली असेल.  

' शासनाने काही नियतकालिकांच्या अनुदानात कपात केली. कोरोनाकाळात नियतकालिकांची कार्यालये सुरू ठेवण्यास परवानगी असली, तरी ती सुरू ठेवून उपयोग नाही. कारण नियतकालिके काढण्यासंबंधी आवश्यक असलेली मजकूर, जाहिराती, छपाई या सर्वांची साखळी काहीशी तुटली आहे. नियतकालिके टपाल कार्यालयात स्वीकारली जात असली तरी ती पुढे सरकत नाहीत, अशा असंख्य अडचणींचा सामना नियतकालिकांना करावा लागतोय. मग अंक काढून ते वाया जातात. त्यापेक्षा पुढील दोन महिने तरी अंक न काढण्याचा निर्णय जवळपास शंभरहून अधिक नियतकालिकांनी घेतला आहे. '

मंडळी, कोरोनाकाळ हा सर्वच व्यवसायांचा परीक्षाकाळ ठरला यांत शंका नाही. मात्र म्हणूनच नियतकालिकांची रड उद्भवली असा समज करून घेणे चुकीचे ठरेल. पुनश्चसाठी आम्ही सातत्याने जुनी नियतकालिके चाळत असतो. तेव्हा अगदी १०० वर्षापूर्वीच्या संपादकीयात सुद्धा, नियतकालिके चालविणे हा कसा आतबट्ट्याचा व्यवहार आहे, होणारा खर्च आणि मिळालेले उत्पन्न यांचा मेळ कसा साधत नाही, पुरेसे सभासद मिळत नाहीत, याबद्दल त्या त्या संपादकांनी खंत व्यक्त केलेली वाचायला मिळते. तात्पर्य, अडचणी या लेखन-प्रकाशन  व्यवसायाच्या पाचवीला पुजलेल्या आहेत. कोरोनाने त्यात भर घातली एवढेच. 

मात्र जणूकाही या सर्वांचा विचार करूनच की काय, बहुविध.कॉमने पहिल्या दिवसापासून सर्वस्वी डिजिटल माध्यमावर आपला भर ठेवला आहे. डिजिटल टेक्नोलॉजी असल्याने छापील अंकाच्या फक्त दहा टक्के खर्चात आपण दर्जेदार मजकूर देऊ शकलो. आणि त्यामुळेच कोरोनाकाळ हा बहुविधसाठी अडसर ठरू शकला नाही. डिजिटल प्रकाशन या विषयाचा गेली दोन वर्षे पाठपुरावा केल्यावर छापील प्रकाशन क्षेत्रातील अनेक मंडळींना आपण बहुविधच्या मंचाची उपयुक्तता पटवून देऊ शकलो. आणि ही सर्व मंडळी त्यांच्या दर्जेदार साहित्यासह आपल्या मंचावर दाखलही झाली. 

सध्या आपण बहुविधवर काय काय प्रसिद्ध करतो याची ही छोटीशी यादी बघा. आणि आपण केलेली माथेफोड कितपत योग्य होती ते ठरवा.  

दिवाळी अंक -  निवडक दिवाळी, मौज

डी-बुक्स - पावणेदोन पायांचा माणूस, तोरा मन दर्पण, युगात्मा, तंबी दुराई २०१८    

ब्लॉग्ज - निवडक सोशल मिडीया, मासिकांची उलटता पाने, मेंदूतील सवय, श्रवणीय  

नियतकालिके - प्रिय रसिक, अनुभव, मराठी प्रथम, रूपवाणी, वयम आणि अर्थातच पुनश्च

यापैकी कोणाकोणाचे सभासदत्व घ्यायचे ?आपल्याला नेमकं काय आवडेल? फक्त तेवढ्याचे पैसे भरले आणि दुसरंही काही वाचावसं वाटलं तर काय ? असे प्रश्न स्वाभाविकपणे वाचकांसमोर उभे राहतात. मात्र आता हा प्रश्न आपण कायमस्वरूपी सोपा करून टाकला आहे. 

यापुढे बहुविधवर केवळ एकच सर्व सभासदत्व असेल. म्हणजे वर्षभराचे फक्त ५१६ रुपये भरून बहुविधवरील  प्रत्येक नियतकालिक, प्रत्येक दिवाळी अंक, प्रत्येक डी-बुक आणि प्रत्येक ब्लॉग, आपले सभासद वाचू शकणार आहेत. इतकंच नव्हे, तर भविष्यात वेबसाईटवर जी जी भर पडत जाईल, ते सर्व साहित्य देखील सभासद याच रकमेत वाचणार आहेत. थोडक्यात नेटफ्लिक्स किंवा अमेझॉन प्राईमवर ज्याप्रकारे एकदा शुल्क भरल्यावर आपण सर्व काही बघू शकतो, तसेच यापुढे बहुविधचेही असेल.  

केवळ 'पुनश्च', केवळ 'वयम', केवळ 'मराठी प्रथम', इ . इ. साठी  ३०० रुपये आनंदाने देणाऱ्या आपल्या वाचकांना वर्षाकाठी फक्त २०० रुपये जादा भरून त्याखेरीज इतके विविधांगी साहित्य वाचायला मिळणार असेल, तर त्यांच्यासाठी ही खुशखबर नव्हे का ? मंडळी, आमच्या मनातील विविध कल्पना जर प्रत्यक्षात उतरल्या, तर वरची यादी कित्येक पट वाढण्याची शक्यता आहे. आणि अर्थात वाचकांवर त्याचा कुठलाही भुर्दंड न पाडता, ५१६ रुपयांतच सर्व साहित्य देत राहावे अशी योजना आहे. मात्र यासाठी आपली सभासदसंख्या अधिकाधिक वाढणे हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे तुम्ही जर बहुविधवरील साहित्याबद्दल समाधानी असाल, तर तुमची मित्रमंडळी, नातेवाईक, समविचारी whatsapp ग्रुप्स यांच्यापर्यंत आपल्या उपक्रमाची माहिती पोहोचवा. 

माहिती पोहोचवणे एवढेच तुमचे काम, बाकी सभासद व्हावे की नाही हे त्यांचे त्यांना ठरवू द्या. आपल्या मजकुरात ताकद असेल तर ते सभासदत्व घेतल्याशिवाय राहणार नाहीत. मात्र या उपक्रमाला वाढवणे हे तुमच्याच हातात आहे. आणि केवळ तुमच्या मोबाईलवरच्या forward बटणाने तुम्ही ते साध्य करू शकता.



प्रतिक्रिया

  1. SHIVAJI BHADANE

      3 महिन्यांपूर्वी

    आता किती वार्षिक वर्गणी आहे? आणि ती कशी भरून सभासद होता येईल? यासंबंधी कृपया सविस्तर कळवावे.

  2. suchita atre

      4 वर्षांपूर्वी

    "Very Nice Initiative" thanks for the same'.

  3.   4 वर्षांपूर्वी

    Thanks



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen