लाख दुखों की एक दवा है...

संपादकीय    संपादकीय    2021-04-05 16:23:15   

‘पुनश्च’चे रूपांतर ‘बहुविध’मध्ये करताना आम्ही ‘साहित्यिक मॉल’ असा शब्द वापरला होता. कोणीही यावे आणि आपल्या साहित्याचे त्यात दुकान थाटावे अशी ती संकल्पना होती. त्यानंतर ‘पुनश्च’ व्यतिरिक्त इतर मासिकेही त्यात आली आणि ‘साहित्यिक मॉल’च्या दिशेने एक  पाऊल पडले. आता त्याहीपलिकडे जाऊन अधिक व्यापक स्वरुपात व्यक्त होण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे साहित्याशी संबंधित सर्वच व्यवहार बहुविधच्या व्यासपीठावर उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने आम्ही आता पाऊल टाकत आहोत. वाचकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच हा विस्तार शक्य होत आहे. वाचक-लेखक यांच्यातील दुवा म्हणून केवळ वाचकांच्या गरजांचा विचार करुन चालणार नाही हे आमच्या लक्षात आले. उत्तम साहित्य ही जशी वाचकांची गरज आहे, त्याचप्रमाणे उतम वाचक ही लेखकांचीही गरज आहे. बहुविधच्या निमित्ताने असा उत्तम वाचक आमच्याशी जोडला गेला आहेच. त्या वाचकाला वाचनाचे दर्जेदार पर्याय उपलब्ध करुन देत असतानाच आता लेखकांसाठीही काही पर्याय आम्ही देत आहोत.

आधी वाचकांचा विचार करु. सध्या जेवढी मासिके बहुविधवर उपलब्ध आहेत, त्यात लवकरच भर प़डणार आहे. ‘रूची’, ‘अनुभव’, ‘प्रिय रसिक’ आणि इतरही काहींनी तशी तयारी दाखवली आहे. यातले काही निःशुल्क असतील. या मासिकांचे सदस्यत्व आधीप्रमाणेच स्वतंत्र किंवा ‘सर्व’ या विभागांतर्गत एकत्र घेण्याची सोय पुढेही सुरु राहणार आहे.

‘डी बुक’ ही इबुकपेक्षा वेगळी, सहज सोपी सोय आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. या अंतर्गत एखादे पुस्तक खरेदी करुन ते मोबाईलवर वाचता येईल. श्रीकांत बोजेवार यांच्या ‘पावणे दोन पायांचा माणूस’ या कादंबरीने याची सुरुवात करत आहोत. पाठोपाठ डॉ यश वेलणकर, तंबी दुराई यांची पुस्तकेही येतील. हळू हळू पुस्तकांची संख्या वाढत जाईल. तुम्हाला किंवा परिचितांना असे ‘डी बुक’ करुन हवे असेल तर तेही करुन देऊ. परंतु त्याआधी त्याचा दर्जा आम्ही तपासू, कारण बहुविधच्या वाचकाला उत्तम तेच वाचायची सवय आहे. यातून हळूहळू डिजिटल वाचनालयाचे स्वरुप आपल्या बहुविधला प्राप्त होईल. पुस्तके घरात साठवून ठेवण्याची गरज नाही. बहुविधवर जा पुस्तक निवडा आणि वाचा.

लेखकांच्या दृष्टीने, अभ्यासकांच्या दृष्टीनेही अनेक सुविधा सुरु होत आहेत. आपल्यापैकी अनेक जण स्वतः किंवा आपले मित्र फेसबुकवर लिहित असतात. काही नियमित ब्ल़ॉगही लिहित असतात. फेसबुवर समजा तुमचे पाच हजार फॉलोअर्स असतील तर फेसबुक तुमची पोस्ट किंवा लेख केवळ पाच सातशे वाचकांपर्यतच पोचवतं. अधिकांपर्यंत पोचवायचे असेल तर तुम्ही फेसबुकची सशुल्क सेवा घ्यावी अशी अपेक्षा असते. तुमच्या लेखनाचा, वाचकांचा, चाहत्यांचा हा प्रवाह तुम्ही बहुविधकडे वळवला तर शंभर टक्के वाचकांपर्यत ते लेख किंवा पोस्ट पोचतील. तुमचा लेख किंवा तुमच्या पोस्ट्स लोकांनी सशुल्क वाचाव्या अशी तुमची इच्छा असेल आणि ते वाचतील असा तुम्हाला विश्वास असेल तर तीही सोय आहे. त्याचे पैसे थेट लेखकाच्या खात्यात जमा होतील अशी आम्ही सोय केली आहे.  

या व्यतिरिक्त काही महत्वाच्या सेवा बहुविधतर्फे उपलब्ध करुन देत आहोत. पीडीएफचे वर्ड फाईलमध्ये रूपांतर करणे, पुस्तकाचे युनिकोड मजकुरात रुपांतर करणे, हस्तलिखित टाइप करुन देणे वगैरे. आणखी एक अतिशय वेगळी संकल्पनाही आकार घेत आहे. आपल्यापैकी अनेकांनी आयुष्यात कष्टपूर्वक यश मिळवले असते, आयुष्य घडवले असते. लाखोंना कदाचित नसेल परतुं आपल्या परिचयातील हजार दोन हजार लोकांना तो संघर्ष सांगावा, आपले आयुष्य उलगडून दाखवावे असे आपल्याला वाटत असते. प्रत्येकालाच लिहिता येत नाही. प्रत्येकालाच व्यक्त होता येत नाही. अशांना आम्ही त्यासाठी मदत करु, त्या व्यक्तिचा एकंदर प्रवास, त्याचे मनोगत, जूनी-नवी छायाचित्रे, व्हिडिओ क्लिप्स यातून एकत्र करु. तो प्रवास तुमच्या पुढील पिढ्यांसाठीही सुरक्षित राहील. त्यांनाही सहज पाहता येईल. एक लिंक पाठवली की थेट विदेशातील तुमचे मित्र, मुले, नातवंड यांच्यापर्यंत ते पोहोचू शकेल.

 थोडक्यात कोणत्याही प्रकारचा साहित्य व्यवहार बहुविधवर शक्य व्हावा असा प्रयत्न आहे. अलिकडच्या काळात ‘अंडर वन रुफ’ ही सोय फार महत्वाची ठरते. ‘प्यासा’मधील जॉनी वॉकरच्या गाण्यात साहिर लुधियानवीने एक ओळ लिहिली आहे- ‘लाख दुखोंकी एक दवा है, क्यों ना आजमाए...’ तसंच काहीसं हे आहे. तर बहुविधच्या या वाढत्या पसाऱ्याला आता हवी आहे, आपली साथ. आजवर मिळाली तशीच यापुढेही.



प्रतिक्रिया

  1. Diwakar Ganjare

      3 वर्षांपूर्वी

    स्तुत्य उपक्रम . . . शुभेच्छा

  2.   4 वर्षांपूर्वी

    खूपच छान कल्पना.वाचक पुस्तके सुचवू शकतात का.?किवा एखादे आऊट आॅफ प्रिंट पुस्तक दिले तर त्याचे डीबुक करून मिळेल का?

  3. Suresh Kulkarni

      4 वर्षांपूर्वी

    मुख्य मुद्दा आहे महाराष्ट्रात वचन संस्कृती जपण्याचा तो कोणत्याही मार्गाने पूर्ण व्हायला हवा पण लॉक डाऊन मध्ये असंख्य लोक रिकामे असूनही वाचकांची संख्या वाढताना दिसत नाही. विकत घेऊन वाचणार्यांना इथं अत्यल्प दरात म्हणजे स्वस्तात अभिरुचीपूर्ण साहित्य मिळतं असूनही वाचक वाढत नाहीत.याची करणं शोधून आणखी उपाय करण्याची गरज आहे. सु. मा. कुळकर्णी, नांदेड.

  4. Mukund Sohoni

      4 वर्षांपूर्वी

    खुप छान उपक्रम आणि कल्पना आहे . अभिनंदन आणि शुभेच्छा.

  5. Asmita Phadke

      4 वर्षांपूर्वी

    खूप चांगला उपक्रम, अनेक शुभेच्छा. माझे आवडते फेसबुकवर लिहीणारे लोक म्हणजे - आनंद मोरे, प्रसाद शिरगावकर, प्राजक्ता काणेगावकर, डॉ . भूषण शुक्ल, माया ज्ञानेश हे सर्व बहुविधवर भेटले तर मजा येईल.

  6. Nitin Bildikar

      4 वर्षांपूर्वी

    वाह स्तुत्य उपक्रम

  7. Naval Shastri Vashimkar Guruji.

      4 वर्षांपूर्वी

    खुप छान उपक्रम

  8. Suhas Joshi

      4 वर्षांपूर्वी

    खूपच छान उपक्रम

  9. Suhas Joshi

      4 वर्षांपूर्वी

    खूपच छान उपक्रम

  10. atmaram jagdale

      4 वर्षांपूर्वी

    छान कलना आहेत . लवकरच नव्या उपक्रमांना मूर्त स्वरूप येवो .

  11. atmaram jagdale

      4 वर्षांपूर्वी

    अतिषय छान कल्पना आहे . त्याला लवकर मूर्त स्वरूप येवो .

  12. avinash manerikar

      4 वर्षांपूर्वी

    खूपच छान उपक्रम!अधिकाधिक सहजसुलभ व जेष्ठांनाही सहज हाताळतां येईल असाही दृष्टीकोन,बदल यात असावेत.खूप टेक्निकल अडचणी येऊं नयेत वां त्यावर व्हाॅट्सअपद्वारा मार्गदर्शन व्हावे!



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen