ललित - संपादकीय आणि अनुक्रमणिका

ललित    संपादकीय    2020-08-14 10:00:51   

नमस्कार, बहुविध परिवारात आजपासून 'ललित' मासिक सामील होत आहे. साहित्य आणि प्रकाशन- ग्रंथ विश्वातील एक विश्वासू नाव म्हणून ललित सर्वदूर ओळखीचे आहे. गेली ५७ वर्षे सातत्याने ललितने हे स्थान टिकवून ठेवले आहे. मराठी साहित्याला डिजिटल व्यासपीठावर स्थान मिळवून देण्याच्या आमच्या प्रयत्ना़ला ललितमुळे अधिक बळ प्राप्त झाले आहे. पुस्तकांचा परिचय, साहित्यिक घडामोडी, साहित्य-समीक्षेच्या क्षेत्रातील कर्तृत्वाची योग्य दखल आणि पुस्तकांच्या जाहिराती ही ललितची वैशिष्ट्ये. 'ठणठणपाळ'ने दीर्घकाळ ललितला हास्यरेषा दिल्या. त्यानंतर अलाणे-फलाणे, गोमा गणेश, आनंद पुणेकर यांनी ती परंपरा सुरु ठेवली. ललितमध्ये अलिकडेच याच पठडीतले 'झारा आणि सराटा' हे सदर सुरु झाले आहे. तर,  या सर्व वैशिष्ट्यांसह 'ललित'चे स्वागत करु या. .......................................... ‘ललित’चा मार्च २०२० चा अंक निघाला. एप्रिलच्या अंकाचीही अक्षरजुळणी जवळजवळ पूर्ण झाली होती. आणि या सुमारासच कोरोना या महामारीने जग हादरून गेले. मुंबईसह सर्व देशात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आणि पळणारी मुंबई एकदम शांत झाली. प्रिंटिंग प्रेस बंद, पोस्ट ऑफीस बंद, त्यामुळे एप्रिलचा अंक प्रसिद्ध करणे शक्य झाले नाही. हळूहळू हे वातावरण निवळेल यासाठी वाट पाहिली. पण सध्या सगळंच कठीण होऊन बसलं आहे. त्यामुळे पीडीएफ स्वरूपात ललित’च्या वाचकांना/वर्गणीदारांना अंक उपलब्ध करून द्यावा, असा निर्णय आम्ही घेतला. ‘ललित’चा एप्रिल-मे-जून असा जोडअंक वाचकांसाठी आम्ही  सिद्ध केला आहे. या तीन महिन्य ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘ललित’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


ललित- एप्रिल-मे-जून २०२०

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.