अंक : ललित, सप्टेंबर २०२०
८०-८१ चा सुमार असेल. बालगंधर्व रंगमंदिरात अक्षरांचं प्रदर्शन भरलं आहे असं सुभाष अवचटने आम्हाला सांगितलं. प्रदर्शनं चित्रांची असतात हे माहीत होतं, पण अक्षरांचं प्रदर्शन? आम्हाला कल्पनाच करता येईना. पहिल्यांदाच कमल शेडगे हे नाव कानावर आलं होतं. काय असेल या प्रदर्शनात, ही उत्कंठा मनात ठेवूनच आम्ही बालगंधर्वच्या कलादालनात पोहोचलो. आता या घटनेला बरीच वर्षे होऊन गेली आहेत. पण तो अनुभव आजही ताजा आहे. आत शिरताक्षणी जे काही डोळ्यांनी अनुभवलं... नवेपणाची एक लाट अंगावर आली त्याचं वर्णन करणं खरंतर अवघडच आहे, कारण कमल शेडगेंचं अक्षर प्रदर्शन हा प्रत्येक कलासक्त मनाला झालेला साक्षात्कार होता. शेडगेंच्या प्रतिभाशाली विचारांची ती रसरसलेली अभिव्यक्ती होती. ‘धुक्यात हरवली वाट’ ही अक्षरं पाहताना सर्वांच्याच नजरा विस्फारल्या होत्या. खरंतर त्या वर्षी कॅलीग्राफी हा विषय आम्हाला स्पेशलायझेशनला होता. त्यावेळी देवनागरी आणि रोमन अक्षरांपलिकडे अक्षरांचं एक सुंदर जग आहे याची आम्हाला कल्पनाच नव्हती. त्यामुळेच शेडगेंची अक्षरं पाहताना त्यांतील विविधता, आशय, आकार, स्पेसिंग आणि कल्पकता पाहून आम्ही अक्षरशः मोहरून गेलो होतो. कमल शेडगे नाव कायमचं मनावर ठसलं होतं.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .