रूप पाहता लोचनी

ललित    अरुण खोपकर    2020-10-21 01:07:59   

अंक : ललित, सप्टेंबर २०२० पुस्तकांच्या दुकानांची पहिली ओळख ही आपल्या वाचनाकरता आवडणारी पुस्तके विकत घ्यावी ह्या माफक गरजेतून झाली. लहानपणी मी पाहिलेल्या मराठी पुस्तकांच्या दुकानात पुस्तक घेणार्‍यात व देणार्‍यात एक काऊंटर असायचा. पुस्तक घेणार्‍याचा देश वेगळा व देणार्‍याचा वेगळा. त्यात फक्त आर्थिक देवाणघेवाण. काऊंटर ओलांडून दुकानात जाण्याचा व्हिसा मिळत नसे. वाचकाने पुस्तकाचे नाव सांगितल्यावर विक्रेता आपल्या साथीदारांना ते ओरडून जाहीर करत असे. त्याचे साथीदार पुस्तकांच्या रांगांत वेगवेगळ्या उंचीवर किंवा पुस्तकाच्या अदृश्य भागात मोक्याच्या जागी दबा धरून बसलेले असत. ते नाव ऐकून किंवा त्याने दिलेली मार्गदर्शक सूचना ऐकून त्यातला योग्य तो मदतनीस अरुंद जागेत व अपुर्‍या प्रकाशात ते पुस्तक शोधायला लागे. उंचीवर आरूढ झालेला मदतनीस एक तर ते पुस्तक वरून  फेकत असे किंवा एखाद्या टोपलीत टाकून दोरीने विक्रेत्याच्या डोक्यावर आदळत असे. वाचकाने पुस्तकांच्या रांगांतून फिरावे, आपल्याला हव्या असलेल्या पुस्तकांखेरीज इतर पुस्तकांत रममाण व्हावे, वाटल्यास त्यातली काही खरेदी करावी ही ग्रंथव्यवहाराची सुसंस्कृत पायरी क्वचितच गाठली जाई. कुमठाशेट यांच्या प्रार्थनासमाजाजवळ असलेल्या ‘बॉम्बे बुक डेपो’त मला मराठी पुस्तकांमध्ये वावरल्याचे सुख सर्वप्रथम मिळाले ते  १९५८ साली म्हणजे मी तेरा वर्षांचा असताना. त्यानंतर  फोर्टातल्या ‘स्ट्रँड बुक स्टॉल’चा  १९६२सालच्या आसपास परिचय झाल्यानंतर सुसंस्कृत ग्रंथव्यवहाराचा खरा धडा मिळाला. विशिष्ट पुस्तक विकत घेण्याकरता पुस्तकांच्या दुकानात जाणारा वाचक व पुस्तकसंस्कृतीचा दर्जेदार वाचक यातला  फरक म्हणजे हा दर्जेदार वाचक पुस्तकांच्या दुकानात न ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


ललित - सप्टेंबर २०२०

प्रतिक्रिया

  1. Chandrakant Chandratre

      3 वर्षांपूर्वी

    फारच सुंदर लेख

  2. bookworm

      3 वर्षांपूर्वी

    फारच छान! वाचनसंस्कृतीचे मर्म उलगडले आहे या लेखातून!वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen