अंक : महा अनुभव दिवाळी २०२०
आगोंद गावात शिरलो तेव्हाच तो कसलासा चमत्कारिक गंध माझ्या नाकपुड्यांत शिरला होता.
“हा कसला वास येतोय इथे?” मी थोडं गोंधळूनच गोविंदबाबला विचारलेलं.
पण त्याने त्यावर काहीच उत्तर दिलं नव्हतं. तो दुसरंच काही तरी ऐकवत राहिला होता. कदाचित आगोंदच्या किनारपट्टीवर विपुल संख्येने आढळणार्या कासवांविषयी किंवा कासवांच्या जगप्रसिद्ध जत्रेविषयी किंवा तसल्याच कशाविषयी तरी.
मी मात्र त्या वासाने काहीसा अस्वस्थ झालो होतो. त्यामुळेच तो गावाविषयी कितीही कौतुकाने काहीही सांगत असला तरी माझ्यापर्यंत ते पोचत नव्हतं.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .