महा अनुभव दिवाळी २०२०
सुशांत रेगेला मी गेली अनेक वर्षं ओळखतो. सुरुवातीला काही वर्षं केवळ तोंडओळख होती. तेव्हा आम्ही दोघं मुंबईच्या गिरगावात राहायचो. तरुण अविवाहित पोरं नाक्यावर रात्री पान-सिगारेटच्या ठेल्यावर फेरफटका मारायला जातात, तशा फेरफटक्यात सुशांत कोणा मित्राचा मित्र किंवा आत्ये-मामे भाऊ म्हणून भेटला. पुढे अधूनमधून असाच भेटत राहिला. त्यातून दोघांना एकमेकांची नावं कळली होती एवढंच. त्यापुढे आम्ही गेलो नव्हतो. केवळ तोंडओळखच राहिली आमची. नंतर दोन-चार वर्षं भेटच झाली नाही. आणि झाली नाही हे जाणवलंही नाही. एकदा असेच रात्री डोंबिवलीच्या एका गल्लीच्या नाक्यावर तशाच रात्रीच्या वेळी भेटलो. त्याने तीनेक वर्षांपूर्वी गिरगाव सोडलं होतं आणि मी सहाएक महिन्यांपूर्वीच डोंबिवलीत संसार थाटला होता.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .