पळसखेड, माझं इवलंसं खेडं. उंच-सखल कोरडवाहू शेतीचं, कष्टाने गांजलेलं. तरीही गीतसंगीत-लोकसंगीत यात आपलं दु:ख विसरून जगासाठी अन्नाचा घास निर्माण करणारं. पिकल्यावर भरभरून आनंदाने नाचणारं, नांदणारं. माझी विहिरीच्या कमी पाण्याची लहान शेती, तिथे निस्सीम कष्टप्रयोग केले. थोडे सुखाचे दिवस आले. मी शेती-पाण्याच्या कविता राज्याला देऊ केल्या. अवघ्या रसिक दुनियेने मला कवेत घेतलं. राजकारण, साहित्य, चित्रपट गीत-संगीत क्षेत्रातल्या दिग्गजांचा सहवास लाभला. लोकप्रियतेचं खूप ऐश्वर्य लाभलं. पण मी इथल्या भूमीला, शेती-मातीला कधीच सोडलं नाही. माझी मुळं इथेच घट्ट रोवलेली. अनेक आघात झाले; दुष्काळ अंगावर आले. मी इथेच, गाव सोडून लहानशा शेतावर रानात घर करून एकटा-झाडासोबत राहिलो.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
निशिकांत tendulkar
4 वर्षांपूर्वीअप्रतिम! वाचनानंदात बुडालो. भान हरपले.