इंग्लिश इज नॉट डिफिकल्ट...


आपल्या देशात इंग्लिशकडे इतर भारतीय भाषांप्रमाणे केवळ भाषा म्हणून पाहिले जात नाही. यशाचा, प्रगतीचा, प्रतिष्ठेचा मानदंड म्हणूनही तिच्याकडे पाहिले जाते. इंग्लिश ही भारतीयांची गरज बनली आहे. त्यामुळेच शिक्षणातील तिचे स्थान अव्वल राहिलेले आहे. तिच्यावर प्रभुत्व संपादन करून देशीविदेशी प्रगतीची दारे खुली करणे ही अनेकांची महत्त्वाकांक्षा असते. त्यात काहींना यश मिळते काहींना मिळत नाही. गेल्या काही वर्षांत इंग्रजी माध्यमाला मिळणारी पालकांची वाढती पसंती पाहिली की लक्षात येते, मराठी शाळांतील इंग्रजीच्या अध्ययनअध्यापनाकडे अधिक लक्ष पुरविण्याची आवश्यकता आहे. मराठी शाळांत शिकून आपल्या मुलांना इंग्लिश चांगले लिहिताबोलता येईल की नाही याविषयी अनेक पालकांना शंका असते. त्यामुळे इच्छा असूनही मराठी शाळांची जोखीम पत्करायला ते तयार होत नाहीत. वास्तविक पाहता, मराठी माध्यमात शिकूनही मुलांचे इंग्लिश सुधारता येते आणि केवळ तेवढ्यासाठी मुलांना इंग्रजी माध्यमात पाठवण्याची आवश्यकता नाही. पण परिस्थितीचा, सभोवतालच्या शैक्षणिक वातावरणाचा रेटा इतका आहे की इंग्लिश माध्यमालाच पहिली पसंती मिळते. अशा वेळी मराठी माध्यमाच्या शाळांतील इंग्लिशच्या अध्यापनाचा दर्जा सुधारून भविष्यातील पालकांना इंग्लिशच्या बाबतीत आश्वस्त करणे हाच एक मार्ग उरतो. जी मुले मराठी माध्यमात शिकताहेत त्यांचे इंग्लिश सुधारण्याचे नवनवीन मार्ग शोधून काढणे, प्रयोगशील उपक्रम राबवणे हे  आव्हान मराठी शाळांतील शिक्षकांनी स्वीकारले तर इंग्लिश माध्यमाचे अनावश्यक महत्त्व कमी होऊ शकेल. अशाच एका उपक्रमाविषयीचा ज्ञानेश्वर जाधव यांचा हा लेख -

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


शिक्षण , भाषा

प्रतिक्रिया

  1. craje

      5 वर्षांपूर्वी

    अभिनंदनीय उपक्रम. अन्य मराठी माध्यमाच्या शाळांसाठी प्रेरणादायीसुद्धा ! गुरूकुल संस्थापक व त्यांच्या सर्व शिक्षकांना सलाम

  2.   5 वर्षांपूर्वी

    धन्यवाद सर गुरुकुल विद्यालय शिंदे ता जि नाशिक फोन 02532802991,

  3. purnanand

      5 वर्षांपूर्वी

    लेख खूप छान .जाधव सरांच्या चिकाटीला सलाम ! कृपया शिन्देगाव च्या शाळेचा पत्ता ,फोन ,इमेल कळवावा . काही पुस्तकांच्या स्वरूपात मदत करण्याची इच्छा आहे.

  4. shilpaneve

      5 वर्षांपूर्वी

    स्तुत्य उपक्रम. अभिनंदन जाधव सर आणि मॅडम!

  5. साधना गोरे

      5 वर्षांपूर्वी

    नमस्कार, लेख वाचण्यासाठी आपणास मराठी प्रथमचे सभासद व्हावे लागेल.

  6. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    खूपच आशावादी चित्र आहे हे.अर्थात त्यामागे जाधव सरांचे अथक प्रयत्न ,धडाडीआणि प्रयोगशीलता आहे.अभिनंदन सर !

  7. shrikant

      5 वर्षांपूर्वी

    Pl open it



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen