जेत्यांच्या भाषेत – राज्यकर्त्यांच्या भाषेत – आपल्याकडे कायदे करण्यास प्रारंभ झाला व अद्यापही त्याच भाषेचा आपण वापर करतो. विशिष्ट प्रांतात विशिष्ट भाषा आपण राज्यभाषा केली, तरी कायदा त्या भाषेत तयार होत नाही. इंग्रजी न जाणणाऱ्यांनी निवडून दिलेले, इंग्रजी न जाणणारे प्रतिनिधी इंग्रजीतील कायदे संमत करत असतात! – लोकभाषेत कायदा असण्याविषयी आग्रही भूमिका मांडणारा न्या. नरेंद्र चपळगावकर यांचा लेख -
...
कायदा पाळणाऱ्यांना न समजणाऱ्या भाषेत कायदे
आपल्या विशिष्ट भूप्रदेशातील नागरिकांचे जीवन नियमित करण्यासाठी शासनसंस्था जे नियम करते, त्याला आपण कायदा म्हणतो. हा नियम किंवा कायदा नागरिकांनी पाळण्यासाठी असतो. यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात. एक तर, हे कायदे ज्यांनी पाळायचे त्यांच्या भाषेत ते असावेत व दुसरी गोष्ट म्हणजे, ते त्यांना समजावून सांगण्यासाठी एखादी यंत्रणा असावी. दुर्दैव असे की, तर्कदृष्ट्या जी गोष्ट एवढी स्वच्छ आहे, ती आपल्या देशात अस्तित्वात नाही. सर्व कायदे बहुसंख्यांना न समजणाऱ्या भाषेत – इंग्रजीत असतात व ते सामान्य नागरिकांना समजावून सांगण्याचा कोणताही उल्लेखनीय प्रयत्न होत नाही.
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
मराठीतून कायदा
, न्या. नरेंद्र चपळगावकर
, मराठी अभ्यास केंद्र