मोल्सवर्थचा मराठी – इंग्रजी शब्दकोश ऐकूनही माहीत नाही असा मराठी माणूस सापडणं कठीण. पण हा मोल्सवर्थ नेमका कोण हे माहीत असणारी मराठी माणसंही तशी कमीच. मोल्सवर्थची मराठी-इंग्रजी डिक्शनरी प्रथम १८३१ मध्ये प्रकाशित झाली. तिची दुसरी सुधारित आवृत्ती १८५७ मध्ये छापली गेली. आजही सुमारे १००० पानांचा मोल्सवर्थचा हा शब्दकोश मराठीतला सर्वांत मोठा शब्दकोश आहे. महाराष्ट्रातल्या न्यायालयात जेव्हा एखाद्या मराठी शब्दाचा अर्थ लावण्याची वेळ येते तेव्हा मोल्सवर्थने दिलेला अर्थ न्यायाधीश प्रमाण मानतात. मोल्सवर्थ ह्या ब्रिटीश माणसाने आपल्याला ही डिक्शनरी तयार करून दिली. इंग्रजांच्या काळात घडलेली त्या शब्दकोश निर्मितीची सत्यकथा अचंबित करणारी आणि आजच्या तरूणांना प्रेरणा देणारी अशी दोन्ही आहे. प्रत्येक मराठी माणसाला ती निदान माहीत तरी असायला हवी. जेम्स थॉमस मोल्सवर्थ हा एक ब्रिटीश लष्करी अधिकारी. जन्म १५ जून १७९५ चा. शालेय शिक्षण व बालपण ब्रिटनमध्ये गेलेलं. त्याकाळी किशोरवयीन ब्रिटीश मुलांना लष्करात दाखल करण्याची पद्धत होती. जेम्स वयाच्या १६ व्या वर्षी ब्रिटीश लष्करात दाखल झाला. एप्रिल १८१२ मध्ये १७ व्या वर्षी त्याला भारतात पाठवण्यांत आले. ब्रिटीश लष्कराच्या पद्धतीप्रमाणे भारतात आलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याला मराठी आणि हिंदी भाषा शिकावी लागे. त्याच्या परिक्षा घेतल्या जात, आणि त्यात पास होण्याची लष्करी सक्तीही असे. जेम्स त्या परिक्षांसाठी मराठी शिकू लागला आणि मराठी भाषेच्या चक्क प्रेमातच पडला. मराठी शब्द जमवण्याचा छंद त्याला लागला. पुढे १८१४ मध्ये त्याला लेफ्टनंट म्हणून बढती मिळाली. १८१८ मध्ये त्याची बदली सोलापूरला झाली. तेव्हा तो २३ वर्षांचा होता. मराठीत भाषांतर करण्यासाठी तो जे शब्द टिपून ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
bookworm
5 वर्षांपूर्वीअप्रतिम लेख! मोल्सवर्थ चे कार्य व त्याची समर्पण वृत्ती अनुकरणीय!
Rdesai
6 वर्षांपूर्वीखूप सुंदर माहिती आहे ..
[email protected]
6 वर्षांपूर्वीभारतीयांना ब्रिटिश राज्यकर्त्यांबद्दल एकाच वेळी प्रेम वाटत असे व त्याच वेळी लोक त्यांचा द्वेष करत . प्रेम वाटे ते त्यांच्या ज्ञान लालसेमुळे , शिस्तीमुळे , आधुनिक विचारसरणीमुळे . अर्थात त्यांच्या साम्राज्यवादी धोरणामुळे ते लोकांच्या रोषासही कारणीभूत झाले . मराठी भाषेच्या प्रगतीसाठी एका ब्रिटिश अधिकाऱ्याचे एवढे मोठे योगदान असावे ही गोष्ट अचंबित करणारी व दुसरीकडे स्वकीय विद्वानांना शरम वाटावी अशी गोष्ट आहे . त्या वेळच्या अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या अंगी हे गुणविशेष आढळत असत . हातात सत्ता असल्यामुळे त्यांचे काम तुलनेने सुकर होत असेल पण असे असले तरी त्यांच्या महान कार्याचे ऋण मान्य न करणे म्हणजे करंटेपणा ठरेल
DhanrajPawar
6 वर्षांपूर्वीसुंदर लेख ?
vrudeepak
6 वर्षांपूर्वीमोल्सवर्थचे ऋण मराठी माणूस कधीच विसरु शकणार नाही.पेशवाईच्या उत्तरकाळातच मोल्सवर्थचे कार्य सुरू झाले होते, ते १८५७चे स्वातंत्र्यसमर संपुष्टात आले तरी सुरुच होते. एखाद्या मराठी भाषिकांनेसुद्धा स्वभाषासंवर्धनासाठी येवढे प्रयत्न खचितच घेतले असतील.
VinayakP
6 वर्षांपूर्वीसुंदर लेख...एका विस्मृतीत गेलेल्या अवलिया ची ओळख आम्हा सर्वांना करून दिल्याबद्दल आभार...?
Pramodsm
6 वर्षांपूर्वीअप्रतिम एका विदेशी भाषेबद्दल एवढे प्रेम आणि आत्मियता खरोखर आचंबित करणारे आहे
deepa_ajay
6 वर्षांपूर्वीअतिशय उत्तम श्री किरण भिडे मी तुमचा ऋणी आहे
krmrkr
6 वर्षांपूर्वीही माहिती अवाक् करणारी आहे. मला ह्या बाबतीत काहीच माहिती नव्हती. भाषेवर असले उत्कट प्रेम असल्याशिवाय असे संकल्प तडीस जात नाहीत. मराठी भाषाप्रेमींनी पंडीत मोलेश्वर शास्त्रींचे आमच्यावरील उपकाराचे नित्यस्मरण ठेवणे अगत्याचे आहे,