शापित यक्षाचे जीवनगाणे

पुनश्च    सतीश चाफेकर    2019-04-15 19:00:11   

जादुई फिरकीचा धनी ठरलेल्या पद्माकर शिवलकर उर्फ पॅडी यांच्या वाट्याला एकही कसोटी सामना आला नाही. परिस्थितीने सोबत न केल्याने त्यांची कारकीर्द अपयशी नव्हे, काहीशी अधुरी ठरली, परंतु त्या अधुरेपणातही जगण्यातला आनंद त्यांनी शोधला. त्या आनंदयात्रेचा पट प्रस्तुत आत्मचरित्रात उलगडला आहे... बापू नाडकर्णी नेहमी म्हणतात, अत्यंत क्रूर खेळ आहे हा, कोणत्या घटनेला काय आणि कोण कारणीभूत होईल, याचा नेम नाही. हे सर्वानाच माहीत आहे गोलंदाजच्या हातून एकदा चेंडू सुटला की, एकतर तो त्याला यशही देतो किंवा बरबादही करतो. पद्माकर शिवलकर म्हटले की, अनेक गोष्टी आठवतात त्याचबरोबर त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा उल्लेख हमखास होतो. परंतु पद्माकर शिवलकर यांनी सहसा, स्वतःबद्दल भाष्य उघडपणे फारसे केले नाही. ते केले तो प्रसंग, अखेर त्यांच्या क्रिकेट-आत्मचरित्रात आढळला. मुंबईतल्या रवींद्र नाट्यमंदिर येथे ‘मराठी माणसावरचा अन्याय' या विषयावर बोलण्यासाठी त्यांना आमंत्रित केले होते. त्यावेळी ते जे बोलले, ते इतके सत्य होते आणि त्याचा परिणामही तितकाच गहिरा होता... त्यावेळचे सभागृह ‘पिन ड्रॉप' झाले होते. त्यांनी मनामध्ये खदखदणारी खंत बोलून दाखवली. ती खंत वाचून आपण फक्त निःशब्द होतो. असे एखाद- दुसरे प्रसंग सोडले तर हे पुस्तक खऱ्या अर्थाने ‘क्रिकेटपटूंची आनंदयात्राच’ आहे. ‘हा चेंडू दैवगतीचा' या आत्मचरित्रात्मक पुस्तकात पॅडी म्हणजे, पद्माकर शिवलकर काय आहेत याचे, त्यांचे त्यांच्याच भाषेमधील शब्दांकन इतके प्रामाणिक नितळ आणि निर्विष आहे, हे जाणवते. पुस्तकाला लेखन सहाय्य आणि संकलन करणारे अरुण घाडीगावकर यांची भूमिका फक्त लेखनिकाची असली तरीही, जणू पद्माकर शिवलकर त्यांच्या भाषेमधून ते ‘लाइव्ह' संवाद साधत आहेत, ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


पुस्तक परिचय , दिव्य मराठी , व्यक्ती विशेष , क्रीडा , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

  1. ajitpatankar

      3 वर्षांपूर्वी

    हे पुस्तक प्रकशित झाल्याचे माहितच नव्हते.. नक्की विकत घेणार.. लेख पुन:प्रकाशित केल्याबद्दल आभार..वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen