महाराष्ट्राच्या विकासाची नवी शक्तीस्थाने

पुनश्च    माधव चितळे    2019-05-04 06:00:54   

महाराष्ट्राच्या-भारताच्या जलनीतीचा, पाणीविषयक धोरणांचा अभ्यास करताना माधवराव चितळे हे नाव टाळून पुढे जाताच येत नाही. भारताची पहिली राष्ट्रीय जलनीती साकारण्यात त्यांचा प्रमुख सहभाग होता.  माधवराव चितळे हे नाव विविध प्रकारे पाण्याशी  जोडलेलं आहे.जलक्षेत्राच्या भूतकाळाचा डोळस अभ्यासक, वर्तमानाचे  भान असणारा सावध व व्यवहारी जलतज्ज्ञ आणि भविष्यात पाण्याचा वापर कसा करावा याबद्दल वैचारिक स्पष्टता असणारा विचारवंत अशा चितळेंच्या व्यक्तिमत्वाच्या विविध बाजू आहेत. महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक परिसरातील जमिनीचा पोत वेगवेगळा आहे आणि पाण्याच्या उपलब्धतेचे प्रमाणही वेगवेगळे आहे . मात्र या स्थितीतही होत असलेले प्रयोग, त्यांचे यश आणि आशादायी भविष्यकाळ याबदद्लचा चितळे यांचा हा सकारात्मक भूमिका मांडणारा लेख-

समाजाचा ऐहिक विकास हा नैसर्गिक परिस्थितीची अनुकूलता, सामाजिक व्यवहारांची सुदृढ बांधणी, समाजाच्या हाती असलेले तंत्र-विज्ञान आणि आर्थिक शक्ती या चार घटकांच्या परस्पर पूरक अशा एकत्रित बांधणीवर अवलंबून असतो. या प्रत्येक घटकाची स्थानिक वैशिष्ट्ये नीट माहिती असणे, त्यांच्या मर्यादा लक्षात घेणे, त्यांच्यात कोठे, किती व कशी भर घालता येईल याबद्दलचा सामाजिक विवेक असणे यावर प्रगतीची दिशा ठरते. जमीन, पाणी, हवा व उर्जा यांची उपलब्धता सर्वत्र सारख्या प्रमाणात नसल्यामुळे जेथे जो घटक विशेष अनुकूल रूपात आहे तेथे त्याच्यापासून अधिकाधिक लाभ मिळण्याच्या दृष्टीने व्यवहारांची व्यवस्था बसवावी लागते. विदर्भातल्या काळ्या जमिनीचा सलग विस्तृत प्रदेश हे विदर्भाचे फार मोठे शक्तिस्थान प्रागैतिहासिक काळापासून आहे. अवर्षणप्रवण प्रदेशांपुढे असणाऱ्या अडचणीला तेथे क् ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


कालनिर्णय , समाजकारण , पुनश्च , माधव चितळे

प्रतिक्रिया

  1. ugaonkar

      6 वर्षांपूर्वी

    बरीच नवी माहिती मिळाली . ६० वर्षात काहीच केले नाही म्हणणार्यांना दाखवा

  2. shakambhari

      6 वर्षांपूर्वी

    माहितीपूर्ण लेख आहे .

  3. deepa_ajay

      6 वर्षांपूर्वी

    अहो हे खुपच गोंडस चित्र दाखवतायत प्रत्यक्ष विदर्भ आणि मराठवाडा दुष्काळाने होरपळून निघतोय हे कसं



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen