अंक : रहस्यरंजन, जून १९५८
कथाकार, कादंबरीकार, नाटककार, पत्रकार अशा विविध नात्यांनी आपण पु.भा. भावे (१२ एप्रिल १९१० ते १३ ऑगस्ट १९८०) यांना ओळखतो. मात्र हिंदुत्ववादी पत्रकार अशी त्यांची एक ठसठशीत प्रतिमा त्यांच्या लेखनातून उभी राहिली, त्या प्रतिमेने अनेकदा त्यांच्या इतर प्रतिमांवर कुरघोडी केली आहे.'सहदेवा, अग्नी आण' या सारखे त्यांचे राजकीय लेख खूप गाजले. भावेंचे जिवलग मित्र आणि विचारांनी पक्के काँग्रेसी असलेले ग. दि. माडगूळकर म्हणायचे, ‘भावेंची भाषाच वेगळी होती. पांढऱ्यावर काळं सगळेच लेखक करतात, पण या लेखकाच्या लेखणीचं टोक उजेडाचं होतं. त्यांचं लिहिणं मला मानवत नव्हतं, पण भिडत होतं. पटत नव्हतं पण पेटवत होतं. तोंड भाजलं तरी खावं वाटावं असा अलौकिक गुण त्या लिखाणात होता.' तर अशा पु.भा.भावेंनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर लिहिलेला हा पूर्णपणे वेगळ्या धाटणीचा लेख आहे. 'रहस्यरंजन'च्या जून १९५८च्या अंकात तो प्रकाशित झाला होता. स्वातंत्र्यवीर सावरकराचं निवासस्थान दादरला आजही आहे.जून १९३८ मध्ये या वास्तूत सावरकर, त्यांच्या पत्नी यमुनाबाई (माई), कन्या प्रभात, पुत्र विश्वास, मोठे बंधू बाबाराव, धाकटे बंधू डॉ. नारायणराव, त्यांच्या पत्नी शांताबाई व त्यांची मुले राहावयास आले. या ठिकाणी त्यांचे शेवटपर्यंत वास्तव्य होते. सावरकर हयात असतानाच भावेंनी लिहिलेल्या या लेखात, या वास्तूत राहणाऱ्या महापुरुषाविषयी, त्याच्या आयुष्याविषयी, त्याच्या उत्तुंगतेविषयी खास भावे शैलीत सांगितलेले आहे. त्यातून भाव्यांची सावरकर भक्ती तर दिसून येतेच शिवाय प्रगाढ शब्दसंपत्तीचेही मर्मग्राही दर्शन होते. सावरकरांच्या जयंतीनिमित्त हा लेख....
लेखक : पु. भा. भावे
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
पुनश्च
, सावरकर
, व्यक्ती परिचय
, रहस्यरंजन
, पु. भा. भावे
व्यक्ती विशेष
swapnil sahasrabuddhe
3 वर्षांपूर्वीकवठ्या, चांगल्या गोष्टीची स्तुती करावी. विज्ञानवादी लेख पुस्तकातून वाचू शकता. सावरकर साहित्य सहज उपलब्ध आहे. भाव्यांचे लेखन वाचायला मिळणे मात्र कठीण झालंय.
Medha Vaidya
4 वर्षांपूर्वीस्वातंत्र्यवीर सावरकरांना प्रणाम! स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अलौकिक व्यक्तिमत्त्व शब्दबद्ध करणं हे खूप अवघड! पण श्री पु भा भावे ह्यांनी समर्पक शब्दात छान केले आहे। त्याच बरोबर स्वजनांनी केलेलं दुर्लक्ष ही व्यथा वाक्या वाक्यात जाणवते। काळजाला भिडते। प्रथमच असं लेखन वाचले।
Sanjay Bhat
4 वर्षांपूर्वीसुंदर लेख
Pandharipande Vijay
4 वर्षांपूर्वीखूप दिवसानंतर, खरे तर वर्षांनंतर, श्री भावे यांचे लेखन वाचले,लहानपण याच लिखाणावर पोसले गेले..ही भाषा आता कुठे गवसत नाही.
[email protected]
5 वर्षांपूर्वीजबरदस्त।सावरकरांचे अलौकिक जीवन एका चित्रा सारखे भावे यांनी ज्वलंत पणे रेखाटले आहे
avinashjee
6 वर्षांपूर्वीहा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'पुनश्च' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'पुनश्च' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा. पुनः सभासद होता येत नाही !
CDKavathekar
6 वर्षांपूर्वीसावरकरांबद्दलचे स्तुतीपूर्ण लेख सादर करणे ऐवजी त्यांच्या विद्न्यानवादी व सामाजिक विषयावरील लेख जे आ' आजही हिंदू समाजाला सातत्याने नवी दृष्टी देतील आसे आहेत ते सादर करावेत .
manisha.kale
6 वर्षांपूर्वीसावरकर यांच्या वरचा भावे यांचा लेख वाचला. वाचताना अक्षरशः गहिवरून आले. वीर सावरकर यांची अतुलनिय देशभक्ती,एक सिद्धहस्त कवी, प्रखर राष्ट्रवाद, अखंड हिंदुस्थानची कल्पना, व्यापक हिंदुत्व, जाती पात निर्मूलन ह्या सर्व प्रचंड कार्याचा त्यांच्याच अमोघ लेखणीचा तेव्हढाच अप्रतिम अविष्कार. माझ्या मते सावरकर म्हणजे काय हे कळण्याचा वस्तूनिष्ठ सर्वसमावेशक असा हा लेख आहे. एका उत्तुंग व्यक्तींमत्व असंख्य विशेषण लावत ते किती हिमालया एव्हडं वंदनीय आहे हे समजलं. पु.भा.भावे हे स्वतः लेखनातील उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. तेव्हा दोन्ही व्यक्तीत्व महान व अतुलनीय. लेख अप्रतिम आणि अवर्णनीय. पण आपला देश दुर्दैवी ज्याला सावरकर नायक की खलनायक हा प्रश्न पडावा. असो. पुन्हा एकदा लेख जतन करून ठेवावा एव्हढा सुरेख आहे.
Shekhar kulkarni
6 वर्षांपूर्वीGood subject ...care on