मी (पूर्णवेळ) लेखक कसा झालो?


शिवराज गोर्ले हे नुसतेच लेखक नाही तर लेखनातला प्रत्येक प्रकार यशस्वीरित्या हातळणारे लेखक. कार्पोरेट विश्वापासून एका चतुरस्त्र लेखक होण्यापर्यंतचा त्याचा प्रवास अफलातून आहे. लेखनाचं यश आणि दर्जा मोजण्याच्या सामान्य फुटपट्ट्या अनेकदा लेखक मोडीत काढतात अथवा निरर्थक ठरवतात. गोर्ले यांनी आपल्या वैविध्यातून या दोन्ही गोष्टी केल्या. त्यांनी स्वतःच आपल्या आश्चर्यकारक लेखनप्रवासाचा मांडलेला हा आलेख अत्यंत रोचक आहे.. ...................................................................... चांगली ‘कॉर्पोरेट करिअर’ सोडून मी ऐन तिशीतच ‘पूर्णवेळ लेखक’ म्हणून जगण्याचा धाडसी (काहींच्या मते वेडेपणाचा) निर्णय कसा घेतला? तो उणीपुरी ३० वर्षे कसा निभावला? कितपत यश मिळवलं? कसा होता माझा ‘पूर्णवेळ लेखक’ म्हणून जगण्याचा अनुभव? हे सारं ‘अंतर्नाद’च्या वाचकांसमोर मांडण्याची संधी मला संपादकांनी दिली आहे. अर्थातच आलेल्या अडचणी – आणि त्यातून मार्ग कसा काढला – हेही लिहायचं आहे. स्वतःवर, विशेषतः स्वतःच्या यशावर लिहिणं अवघड असतं. ‘आपुली आपण स्तुती करे तो एक मूर्ख’ हे मीही जाणतो. म्हणूनच प्रारंभी हे स्पष्ट करतो, की मी स्वतःला ‘मोठा साहित्यिक’ मानत नाही. साहित्यिक म्हणून माझी ‘यत्ता’ काय हे ठरवण्याचा अधिकार समीक्षकांनाच आहे. काही (तुरळक) मोठ्या मनाचे समीक्षक/पत्रकार माझा उल्लेख ‘चतुरस्त्र लोकप्रिय लेखक’ म्हटलेलंही मी स्वीकारू शकतो. पण काही मंडळी माझं लेखन ‘गल्लाभरू’ असल्याचं मानतात, ते मात्र पूर्णतः अमान्य आहे! मी असं प्रामाणिकपणे मानतो, की अजूनही मी किती वैविध्यपूर्ण लेखन केलं आहे आणि मी लेखक म्हणून किती व कसं यश मिळवलं आहे, त्या यशाचे किती विविध पैलू आहेत याची समीक्षकांनाच काय, माझ्या काही प् ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अंतर्नाद , अनुभव , दीर्घा , शिवराज गोर्ले

प्रतिक्रिया

  1. [email protected]

      4 वर्षांपूर्वी

    खुप छान लेखन केले आहे गोर्ले सर हे सबकुछ आहेत

  2. YK'S

      5 वर्षांपूर्वी

    ???



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen