गोपाळ गणेश आगरकर यांनी लोकमान्य टिळकांबरोबर झालेल्या तात्विक मतभेदांनंतर १८८८ साली स्वतःचे 'सुधारक' हे साप्ताहिक सुरू केले. सुधारकमधील इंग्रजी मजकूर गोपाळ कृष्ण गोखले लिहित असत. स्वातंत्र्य आधी हवे की समाजसुधारणा ? या वादात त्यांचा पक्ष समाजसुधारणांच्या बाजूने उतरला आणि त्यांनी टिळकांच्या पक्षाविरुद्ध तेव्हढ्याच तडफेने लेखणी चालवली. बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या निमित्ताने या दोन्ही पक्षातील वैचारिक तुंबळ युद्धाचा अनुभव संपूर्ण महाराष्ट्राने त्यावेळी घेतला. प्रस्तुत पुस्तकात आगरकरांच्या मृत्यूपर्यंत ७ वर्षं म्हणजे १८९५ सालापर्यंत त्यांनी सुधारकच्या संपादकपदी असताना जे लेखन केले त्यातले निवडक साहित्य घेतले आहे. दीर्घ प्रस्तावना ग. प्र. प्रधानांची आहे तीदेखील वाचण्यासारखी आहे. पुस्तकाचे प्रकाशन साहित्य अकादमीने केले आहे. - संकलन Google Key Words- Gopal Ganesh Agarkar, Saptahik Sudharak, G.P. Pradhan, Sahitya Academy Publication ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .