एक आगळे विद्यापीठ


पुस्तकपंढरी: जाने/फेब्रुवारी १९९२ लेखाबाबत थोडेसे : मौज प्रकाशनाचे 'सत्यकथा' हे नियतकालिक आणि त्याचे संपादक राम पटवर्धन हे त्यांच्या कार्यकाळातच एक दंतकथा बनून राहिले होते. नंतर वाचकप्रिय झालेल्या कित्येक लेखकांनी त्यांची उमेदवारी पटवर्धनांच्या देखरेखीत सुरु केली. त्यावेळी सत्यकथेचा दबदबा एव्हढा होता की त्यात कविता, कथा प्रसिद्ध व्हावी म्हणून सर्व लेखक अक्षरक्षः झुरत. आणि ती एकदा प्रसिद्ध झाली की मोक्षप्राप्तीचा आनंद मिळवत. राम पटवर्धनांनी संपादनाच्या कार्यक्षेत्रात जो मानदंड तयार केला त्यास तोड नाही. नवोदीत लेखकांना प्रोत्साहन देण्याचे कामही ते मोठ्या जबाबदारीने करत. प्रस्तुत लेखामध्ये लेखिकेने राम पटवर्धन यांची एक साक्षेपी संपादक म्हणून ओळख करून दिली आहे, परंतु त्याच बरोबर एक उमदा माणूस म्हणून असलेले त्यांच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू उलगडून दाखवले आहेत. पुस्तकपंढरी: जाने/फेब्रुवारी १९९२ मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च... ********** पटवर्धनांची आणि माझी ओळख सत्यकथेच्या कचेरीतच एका संध्याकाळी झाली. नक्की आठवत नाही पण अंदाजे ते १९६६-६७साल असावं. दिवाळी नुकतीच संपली होती. लग्नानंतरची पहिली सहा-सात वर्षं एकत्र कुटुंबात (चर्चगेट म्हणजे गिरगावाच्या जवळ) आमचं वास्तव्य असूनही किंवा असल्यामुळेच 'सत्यकथा' हे नाव कानावरून जाण्याचं कारणच नव्हतं. आम्ही दादरला स्वतंत्र बिऱ्हाड केल्यानंतर मी मराठी पुस्तकाचं वाचन करायचा सपाटा लावला. हाती सत्यकथेचे अंकही आले. सत्यकथेचा बोलबाला कानावर पडू लागला. कॉलेजमधल्या फडके-खांडेकरी वाङ्मयाने थबथबलेल्या माझ्या मनासमोर वास्तवतेचं एक अनोखं दालन खुलं झालं. सत्यकथ ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


पुस्तकपंढरी , मौज , सत्यकथा , अनुभव कथन , व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया

  1. [email protected]

      4 वर्षांपूर्वी

    Khoop awadala lekh. Thanks for sharing.

  2. natujaya

      4 वर्षांपूर्वी

    फारच छान . त्यावरून निर्मला देशपांडे यांच्या "टिकलीएवढे तळे "या सुंदर पुस्तकाची आठवण झाली .वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen