लेखाबद्दल थोडेसे-
अंक: मनोविकास प्रकाशन दीपावली विशेषांक २०१५ लेखक, कादंबरीकार आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अरुण गद्रे यांचा वैद्यकीय प्रवास वेगळ्या सामाजिक जाणिवेनं होत गेला. किनवट, लासलगाव यांसारख्या भागात कुठल्याही वैद्यकीय सेवेची उपलब्धता नसताना, असंख्य अडचणी आणि आव्हानांना सामोरं जात डॉक्टरांनी अनेक वर्षं आरोग्यसेवा पुरवण्याचं काम केलं आणि या सगळ्या अनुभवातून लेखनही केलं. गेल्या काही वर्षांत एका समाजसेवी संस्थेत ते काम करत होते. तिथल्या अनुभवांवर आधारित कादंबरी त्यांनी लिहिली - ‘कैद केलेले कळप.’ एका अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांच्या बुद्धिमान तरीही संवेदनशील आणि सामाजिक जाणिवेनं काम करणार्या सृजनशील लेखकाच्या लेखणीतून उतरलेली ही नवी कादंबरी लिहिली गेली तरी कशी, याचा स्वत: लेखकानं घेतलेला वेध.
लेख-
आज जेव्हा मी या प्रश्नाचा विचार करतोय, की ‘कैद केलेले कळप’ ही कादंबरी मी का लिहिली, तेव्हा मुळात, मी लिहितोच का, या प्रश्नाचं उत्तर शोधणं मला आवश्यक आहे. याचं उत्तर माझ्याजवळ आहे. बर्याच वर्षांपूर्वी दिवाळीची आणि मे महिन्यातल्या सुट्टीची मी वाट बघत असायचो आणि सुट्टीत जर मुंबईला बहिणीकडे जायचं ठरलं, तर मुंबईचं अजून एका कारणामुळे मला आकर्षण असायचं - मला मुंबई भेटीत विजय तेंडुलकर यांना भेटता येत असे. ते होते माझ्या ‘एक होता फेगाड्या’ या कादंबरीचे फॅन. त्यांनीच ते मला सांगितलं होतं. त्यांचं तशा अर्थाचं एक पत्र म्हणजे आजही माझा एक मौल्यवान ठेवा आहे. एकदा त्यांच्याशी बोलताना हा विषय निघाला होता, की मी का लिहितो? कादंबरी का? ‘फेगाड्या’ लिहिताना माझ्याकडे महिन्याला पन्नास डिलिव्हरी होत होत्या. अन् पहाटे तीन वाजता उठून मी ती कादंबरी झपाटल्यासारखी लिहिली...
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
आरोग्य
, दीर्घा
, अनुभव कथन
, मनोविकास प्रकाशन
, साहित्य रसास्वाद
Sandhya Limaye
5 वर्षांपूर्वी2015 साली
atmaram-jagdale
5 वर्षांपूर्वीही कादंबरी केव्हा प्रसिद्ध झाली ?
atmaram-jagdale
5 वर्षांपूर्वीलेख आवडला . खूपच नवीन आणि माहित नसलेली माहिती देणारा असा वाटला .अशा जगापासून आपण खूपच दूर असतो . अशा अभ्यासू लेखकांमूळे नवे नवे विषय आशय समजत जातात . आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत जातात . छान लेख आहे आवडला .
amarsukruta
6 वर्षांपूर्वीकैद केलेले कळप वाचायलाच पाहिजे
किरण भिडे
6 वर्षांपूर्वीते डॉ अरुण लिमये...
ugaonkar
6 वर्षांपूर्वीहे अरुण गद्रे म्हणजे cloroform वाले नाहीत.! विषय समजून घेणे पण कठिण आहे .