परमाणूंची महाराष्ट्रावर स्वारी! (इसवी सन १९४७ ते १९८०)

पुनश्च    वि. वि. गोखले    2019-08-21 06:00:06   

अंक – किर्लोस्कर, मार्च १९४७

पुढील पन्नास वर्षांनी, शंभर वर्षांनी जग कसं असेल हा विषय जगात सगळीकडेच भूरळ घालणारा आहे. स्वातंत्र्य मिळाल्यावर पुढील ३०-३५ वर्षात देश कसा बदलेल याची कल्पना करणारा हा लेख स्वातंत्र्याची चाहुल लागलेली असताना, म्हणजे मार्च १९४७च्या  किर्लोस्करच्या अंकात प्रसिद्ध झाला होता. या लेखाच्या अगदी सुरुवातीलाच आपण चमकून अडखळतो कारण लगेचच १९४८ साली मराठी भाषक महाराष्ट्र या राज्याची निर्मिती होईल असे हा लेख म्हणतो. ती व्हायला पुढे तब्बल १३ वर्षे लागली. या शिवाय भविष्यातील अनेक शक्यतांचा वेध हा लेख घेतो, त्यातीस काही खऱ्या ठरल्या तर काही केवळ स्वप्नरंजन. परंतु लेखक वि. वि. गोखले (न्यूयॉर्क) यांच्या कल्पकतेबद्दल आश्चर्य व्यक्त करीत हा लेख वाचताना आज खूपच गंमत वाटते...ही म्हटलं तर कथा आहे, म्हटलं तर ‘फँटसिकल’ लेख-

********

चित्रविचित्र आणि रंगीबेरंगी विद्युद्दीपांनी आणि विद्युन्नलिकांच्या प्रचंड जाहिरातींनी लकाकणाऱ्या न्यूयॉर्कच्या ४२ व्या रस्त्यावरून सातव्या अव्हेन्यूच्या दिशेने मीं झपाझप पावलें टाकलीं आणि ९४ व्या रस्त्याकडे जाणारी जमिनीखालची सब् वे (आगगाडी) पकडली. ९४ व्या रस्त्यावरील स्वामी प्रज्ञानंदांच्या रामकृष्ण आश्रमामध्ये आज ‘हठयोग आणि राजयोग’ या विषयावर व्याख्यान होते आणि त्यासाठी सुमारे दीडशे अमेरिकन स्त्री-पुरुष जमा झाले होते. व्याख्यान फार चांगले रंगले आणि व्याख्यानानंतर स्वामीजींचे आभार मानून अमेरिकन श्रोते घरोघर निघून गेले. परंतु त्या व्याख्यानाने आणि त्या दिवसाने माझ्या आयुष्याला एक अत्यंत विलक्षण कलाटणी दिली, आणि एक चमत्कारिक घटना माझ्या आयुष्यांत निर्माण केली. 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


कथा , किर्लोस्कर , विज्ञान कथा
कथा

प्रतिक्रिया

  1. Kiran Joshi

      3 वर्षांपूर्वी

    मस्त! आता व तेव्हा तुलना करता लेखक किती कालातीत विचार करू शकतो याचा प्रत्यय येतो.

  2. Hemant Marathe

      3 वर्षांपूर्वी

    Interesting

  3. किरण भिडे

      5 वर्षांपूर्वी

    खूप छान माहिती...धन्यवाद.

  4. ajitpatankar

      5 वर्षांपूर्वी

    सुधारणा: अनुक्रमांक ३, आर्थर सी.क्लर्क ची '2001: A Space Odyssey” कादंबरी १९६८ सालची.

  5. ajitpatankar

      5 वर्षांपूर्वी

    मनोरंजन म्हणून लेख ठीक आहे.. पण भविष्यात काय घडेल याची परिकल्पना करण्यात भारतीयांची कल्पनाशक्ती तोकडी पडते हे मात्र खरं आहे. अमेरिकन किंवा पाश्चिमात्य लेखकांची काही उदाहरणे खाली देत आहे. कुठचाही शोध लागला की “हे आमच्या पूर्वजांना पाच हजार वर्षांपूर्वीच माहित होतं” असं म्हणणाऱ्या लोकांनी, हे लेखक भारतात जन्मले असते, तर त्यांना ऋषी-मुनींचा दर्जा देऊन टाकला असता. असो. १) जोनाथन स्विफ्ट च्या “'Gulliver's Travels” ह्या १७२६ सालच्या कादंबरीत मंगल ग्रहाला दोन चंद्र आहेत असे म्हटले आहे. हे त्यानंतर दीडशे वर्षांनी म्हणजे १८७७ साली शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झाले. २) एडवर्ड बेलमी च्या 'Looking Backwards” या १८८८ सालच्या क्रेडीट कार्ड ची कल्पना मांडली आहे. क्रेडीट कार्ड १९५० साली अस्तित्वात आले. ३) आर्थर सी.क्लर्क च्या '2001: A Space Odyssey” या कादंबरीत उपग्रहाद्वारे संपर्क अशी कल्पना मांडली आहे. ४) आल्डस हक्सलेच्या 'Brave New World” या १९३२ सालच्या कादंबरीत GENETIC ENGINEERING चा वापर करून एक नवीन मानव प्रजाती निर्माण करण्याची कल्पना मांडली आहे. GENETIC ENGINEERING १९७२ प्रत्यक्षात आले. ५) जॉर्ज ओरवेल च्या “१९८४” या १९४९ साली लिहिलेल्या कादंबरीत देशांची सरकारे नागरिकांवर हेरगिरी करतील असे म्हटले आहे. आजच्या IT च्या युगात काहींही शक्य आहे. ६) Hugo Gernsback या लेखकाने १९२५ साली लिहिलेल्या 'Ralph 124C 41+,' या पुस्तकात सौरउर्जेचा वापर करण्याची कल्पना मांडली. १९७८ मध्ये सौरउर्जेवर चालणारे पहिले उपकरण, म्हणजे calculators, वापरात आले. आणि सगळ्यात महत्वाचे ७) जुल्स व्हर्न च्या १८६५ सालच्या 'The Earth to the Moon” या पुस्तकात चांद्र मोहिमेचे वर्णन आहे. १०४ वर्षांनी १९६९ साली पुस्तकात वर्णन केल्यानुसार exactly त्याच पद्धतीने हे मोहीम साकारली गेली. पुस्तकात ज्या ठिकाणी या मोहिमेचे base station असेल असे म्हटले आहे exactly त्याच ठिकाणी ते उभारण्यात आले. अशी आणखीही उदाहरणे आहेत. तूर्तास एवढेच.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen