कपाळावर भलंमोठं कुंकू, केसांत सिंदूर, किंचित घरगुती वाटावी अशी साडीची बांधणी... आणि चेह-यावर विलक्षण आत्मविश्वास. दोन्ही बाजूला कागद आणि फायलींचे गठ्ठे, मधल्या कागदांवर स्टिकी नोट्स चिकटवलेल्या आणि स्वतः काढलेल्या नोंदीचा कागद वेगळा. एका बाजूला काचेचा ग्लास आणि डोळ्यांत `आता तुम्हाला पाणी पाजते` असा किंचित खट्याळ भाव. एवढी सगळी सामग्री जमवून त्या भाषणाला उभ्या राहायच्या आणि `अध्यक्षजी` अशी सुरवात करायच्या, तेव्हा लोकसभेतले सदस्यच काय, पण अवघा देश सावरून बसायचा. ही विद्युल्लता आता चमकणार अशी खात्रीच असायची. अर्थात व्हायचंही तसंच. एखादी वीज कोसळावी तशी ही विद्युल्लता विरोधी पक्षांवर इतक्या जोरात कोसळायची, की भलेभले धारातीर्थी पडायचे. एक शब्दसुद्धा `फंबल` नाही, चुकीचा नाही़; अनेक जबरदस्त दाखले, अफाट हिंदीला इंग्रजी आणि संस्कृतची जोड, मार्मिक निरीक्षणं, हजरजबाबी स्वभाव, एकीकडं समोरच्याचं बीपी वाढवणारी जोरदार टीका आणि त्याच वेळी खुसखुशीत `वन लायनर्स.`... सुषमा स्वराज यांनी गेली जवळजवळ पंचवीस वर्षं हे सगळं समीकरण इतकं विलक्षण पद्धतीनं तयार केलं होतं, की त्यांचं भाषण म्हणजे डोळे, कान, विचार, हृदय या सा-यांचे ठाव घेऊन जायचं. अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखे नेते एकीकडं वक्तृत्वाचे मापदंड तयार करत असताना प्रमोद महाजन, सुषमा स्वराज, अरुण जेटली यांच्यासारखे नेते वक्तृत्वाची स्वतःची एकेक स्कूल्स तयार करत होते. राजकारण हा विषय कनिष्ठ मध्यमवर्गीय घरांमध्ये जेव्हा फारसा चर्चेचा नसायचा, त्याच्याबद्दल पूर्वग्रह असायचे, तेव्हा सुषमाजी, प्रमोद महाजन, जेटली अशा नेत्यांमुळं नव्वदीच्या दशकात अनेकांना राजकारणाची गोडी लावली होती, हेही तितकंच खरं. सुषमा स्वराज म्हणजे फक्त वक्तृत्व नव्हतं. ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
[email protected]
5 वर्षांपूर्वीखुप सुंदर लेख आहे सुषमा जी चे वक्र्तव फार छान होत त्या बहुभाषा पंडीत होत्या.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
[email protected]
5 वर्षांपूर्वीअप्रतिम तळपली वीज..कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती..! हाच जीवनाचा आदर्श म्हणून,संपूर्ण आयुष्य देशाप्रती वाहून घ्यायला ध्येयवेडेपणा असावा लागतो. तो त्यांच्या जवळ निश्चित होता..✍🙏🙏
Namrata
6 वर्षांपूर्वीवा, अप्रतिम आहे लेख.साक्षात सुषमाजी उभ्या राहिल्या डोळ्यांपुढे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे सुरेख आणि अचूक वर्णन. मस्तच!
Rdesai
6 वर्षांपूर्वीखरच देशाच्या या अशा काळात सुषमाजींची गरज होती? पण काय करणार तळपती वीज फार काळ टिकत नाही.तिचा लख्ख प्रकाश घेऊन पुढील वाटचाल करुया.सुषमाजींना विनम्र अभिवादन.