fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

मराठी भाषा- तंत्र आणि मंत्र- भाग २५



मराठीभाषा ७७ – मोक्ष/मुक्ती

स्वतंत्रता भगवतीचे स्तोत्र गाताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटलेले आहे, ‘मोक्ष-मुक्ति ही तुझीच रूपे!’ या ओळीत मोक्ष आणि मुक्ती हे दोन शब्द आले आहेत आणि वरवर पाहाता ते एकाच अर्थाचे दिसतात परंतु ते वेगळे आहेत. मोक्ष म्हणजे सुटका. जन्ममरणांच्या चक्रातून सुटका. पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा न लागणे म्हणजे मोक्ष.

मुक्तीचा विचार करताना या ठिकाणी ‘चारी मुक्ती’ ही संकल्पना लक्षात घेतली पाहिजे. त्या चार मुक्ती आहेत, सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्य. या चारही मुक्तींचा संबंध देवाशी / परमेश्वराशी समीपतेचा आहे. म्हणजेच इथे पुनर्जन्मातून सुटकेचा विषय नसून देवता संपर्क महत्त्वाचा आहे.

‘मोक्ष’ ही संकल्पना कोणत्याही देवता-विशेषाशी संबंधित नाही! म्हणून हे दोन शब्द वेगवेगळ्या अर्थाचे आहेत. यावरून सावरकरांनी किती सखोल विचार करून हे दोन्ही शब्द योजले होते हे देखील लक्षात येते.

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

Leave a Reply

Close Menu