काल गंमतीत श्रावण पाळण्याबद्दल पोस्ट लिहिली, पण पाळी लांबवण्याच्या गोळ्या घेण्याचा विषय निघाला आणि अंतर्मुख व्हायला झालं. श्रावण सुरू झाला की एकापाठोपाठ सण, व्रत वैकल्ये सुरू होतात. गणपती बसतात, गौरी येतात, मग घट, नवरात्र ... आणि आमच्याकडे 'त्या' गोळ्या मागण्यासाठी गर्दी सुरू होते. बऱ्याच जणी थेट मेडिकल स्टोअर्स मधून घेतात. पण काही फार्मासिस्ट डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय टॅब्लेटस द्यायला नकार देतात, आणि काहीजणी हेल्थ कॉन्शस असतात; डॉक्टर सांगतील त्याच गोळ्या घ्यायच्या असतात त्यांना. मग या फॅमिली डॉक्टर किंवा लेडी डॉक्टरकडे येतात. हा विषय 'मूर्खपणा आहे हा', ' विटाळ पाळणारे बायका/पुरुष मठ्ठ आहेत', इतका सरळ सोपा नाही. आणि सरसकट बायकांवर दोषारोप करण्यातही काही अर्थ नाही. या विषयाचे दोन पैलू आहेत; स्त्रीच्या प्रजननक्षम काळात दर महिन्यात घडणाऱ्या नैसर्गिक घटनेला अपवित्र मानणे, आणि या समजुतीमुळे विशिष्ट प्रसंगी घेतल्या जाणाऱ्या हॉर्मोन्सच्या गोळ्या व त्यांचे दुष्परिणाम. पाळी म्हणजे धार्मिक कार्यासाठी अपवित्र, वर्ज्य हे सर्वांच्या आणि खुद्द स्त्रियांच्या मनातही खूप खोल रुजलेले आहे. ते सहजासहजी जाणार नाही. प्रत्येक कुटुंबात पिढ्यानपिढ्या चालत आलेले काही ना काही धार्मिक विधी, कर्मकांडे असतात. कालौघात काही बदल घडले असतील, पण देवाधर्माशी निगडित कुठलाच विधी, पूजा नाही अशी कुटुंबं अगदी अपवादात्मक. बहुतेक कुटुंबांत हे सणवार पारंपरिक पद्धतीने साजरे होतात; बऱ्याचदा एरवी स्वतंत्र राहणारी भावंडं एकत्र येऊन हे विधी, कुळाचार करतात. त्यामुळे हा विषय, निर्णय त्या स्त्रीचा, किंवा त्या जोडप्याचाही राहत नाही. त्यात मागच्या पिढीचे विचार या बाबतीत अजून कर्मठ असतात. अशा सगळ्या प ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
maratherr
6 वर्षांपूर्वीThis article has no message
maratherr
6 वर्षांपूर्वीI don’t know what author is trying to convey through this article
MaheshKhare
6 वर्षांपूर्वी'अडचण' असलेल्या विषयावरील अतिशय संतुलित लेख ! याबद्दल महिलांमध्येच इतके गैरसमज असतात की बोलायला नको. पुरुषांनी या बद्दल बोललेलेही पसंत पडत नाही. सततचे प्रबोधन हाच उपाय आहे.