उपोद्घात - माझं आजोळ लालबागचं. सुरुवातीची मुंबई कोकणातून उतरली ती भाऊच्या धक्क्यावर आणि मुंबैची नंतरची पिढी जन्मली ती परळच्या वाडीयात. माझा जन्मही वाडीयाचाच. पुढं जे काही लालबाग आणि लालबागेतल्या सणांचं वर्णन केलंय, ते माझ्या लहानपणी आई-मामाचं बोट धरून फिरताना मला त्यावेळी जे दिसलं आणि त्या वयात मला त्याचं जे आकलन झालं, तसंच लिहायचा प्रयत्न केलाय. आता हे सारं लिहीताना मी त्याच सात-आठ वर्षाच्या वयात आहे असं समजून लिहीलंय. माझ्या बालपणी मी अनुभवलेल्या गोष्टी व मी तेंव्हा त्यांचा लावलेला तेंव्हाच अर्थ जशाचा तसा दिलाय. म्हणून तो कदाचित आताच्या माझ्या आणि तुमच्याही आताच्या 'समजे'शी जुळेल असं नाही. लेखाचा समारोप मात्र आताच्या परिस्थितीचा संदर्भ देऊन केलाय. हे सारं लक्षात ठेवून हा लेख वाचावा. ह्याच परिसरात लहानाचं मोठं झालेल्या व्यक्तींचा त्याच गणेशोत्सवांचा अनुभव माझ्यासारखाच असला तरी त्यांच्या त्यावेळच्या आकलनानुसार त्याच्या अर्थात फरक पडू शकतो हे कृपया ध्यानात घेऊन हा लेख वाचावा हि विनंती. हे इतिहास लेखन नाही, तर आठवणी आहेत आणि त्या वयाचा होऊन लिहिण्याचा प्रयत्न मी केला आहे. शब्द आताचे असले, तरी भावना त्या लहान वयातलीच आहे. *** तेंव्हा- मध्य मुंबईचा लालबाग भाग हा नेहेमीच उत्सवी राहीलाय. किंबहुना उत्साह आणि उत्सव याचं दुसर नांव म्हणजे लालबाग, असं म्हणायलाही हरकत नाही. नेहेमीच्या जीवनात बारश्यापासून ते मयतापर्यंत लालबागकरांचा हा उत्साह सारखाच असतो आणि सणांमध्ये तर हा पार फसफसून उफाळून येतो. हा भाग म्हणजे गिरणगाव समजल्या जाणाऱ्या भागाचं धडधडत हृदयच जणू..! कोणत्याही आकर्षक स्त्रीकडे माणसं आकर्षित होतातच, तसं देशभरातून लोक मुंबैकडे आकर्षित झाले, ते मुंबई ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
इतिहास
, समाजकारण
, अनुभव कथन
, मुक्तस्त्रोत
gadiyarabhay
6 वर्षांपूर्वीलालबाग मध्ये न राहिलेल्या माणसाच्या डोळ्यासमोर देखील लालभाग उभा राहील इतकं सुंदर लेखन
gondyaaalare
6 वर्षांपूर्वीश्रीगणपतीबाप्पाच्या पवित्र उत्सवाला आलेल्या हिडीस रुपाला आरसा दाखवणारा छान लेख
shripad
6 वर्षांपूर्वी"पापं वाढली की परमेश्वर विराट स्वरूप दाखवतो, असं कुठंतरी पुराणकथांत वाचलं होतं, ते खरच असावं असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे सध्या, हे मात्र खरं..!" एकदम योग्य आणि अचुक वर्णन!
deepa_ajay
6 वर्षांपूर्वीमस्त मंजे मस्त,
Ajitdixit
6 वर्षांपूर्वीVery good article
Ruchi karandikar
6 वर्षांपूर्वीNo comment