महाराष्ट्र टाईम्स- पाहती पक्वान्न क्षेत्रींचे ते…... https://bit.ly/2mehVYw { सातारचे महाराज उदयनराजे भोसले तीन-चार महिन्यांपूर्वी शिवसेना-भाजप युतीवर टीकेची झोड उठवून 'राष्ट्रवादी'चे खासदार झाले. मात्र, 'कमळा'ने त्यांचा 'भुंगा' केलाच. त्यांच्या दिव्यदृष्टीला आता कमळाच्या आतूनच प्रगत महाराष्ट्र दिसू लागला आहे. बारामतीकरांचे शेजारी इंदापुरी हर्षवर्धन पाटील यांच्याइतका तरबेज सत्ताकुक्कुट तर शोधून सापडणार नाही. मतदारसंघाच्या विकासासाठी अपक्ष-काँग्रेस-भाजप अशी कोणतीही शय्या त्यांना चालते. कोकणी भास्कर जाधवांना 'राष्ट्रवादी'ने प्रदेशाध्यक्ष केले तेव्हा शरद पवारांच्या कृतज्ञतेपोटी त्यांचा गळा (जाहीर) दाटून आला होता. आज त्यांचा तोच गळा 'मातोश्री'वर भरून येतो आहे. महाराष्ट्राला पाठीत खंजीर खुपसण्याची थोर परंपरा आहेच. पण आज खंजीर बनविणारे कारागीर अहोरात्र मेहनत करीत असूनही पुरवठा कमीच पडतो आहे. } उपमा आणि अलंकारांनी सजलेला आजचा निवडक अग्रलेख मटाचाच महाराष्ट्र टाईम्स, संपादक- अशोक पानवलकर *** मुंबई तरुण भारत - फुटलेल्या हौदाचा आलाप https://bit.ly/2kNGf33 { पवारांचे अनुयायी पक्षातली सध्याची ओहोटी पाहून, “किनार्यावर घर बांधू नका, साहेब समुद्र आहेत,” अशा फुशारक्या मारतानाही दिसतात. परंतु, ते समुद्र वगैरे नाहीत तर ठिकठिकाणचे सुभेदार, सरंजामदार गोळा करून उभारलेल्या हौदाचीच भूमिका शरद पवारांनी वठवली. आता तोच हौद चारही बाजूंनी बेफान फुटलाय, तुटलाय, त्याला पडलेले भगदाड कसे बुजवायचे, ही पवारांपुढची मुख्य समस्या आहे आणि त्यासाठीच त्यांचा सारा ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
सुधन्वा कुलकर्णी
6 वर्षांपूर्वीअसं नक्कीच होवू शकतं. पण शेवटी हे सर्व अग्रलेख म्हणजे वेगवेगळे दृष्टीकोन आहेत. आणि ते तसे असणारच. :)
[email protected]
6 वर्षांपूर्वीवेगवेगळे अग्रलेख वाचून confuse होतो असं वाटतंय कोण खरं आणि कोण खोटं