लोकसत्ता - उपयोगशून्य स्वामी https://bit.ly/2mcOsOC साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी परवा भाजपमध्ये प्रवेश केला. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजानादेश यात्रेत ते काल सहभागी झाले. त्या प्रसंगी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतःचे संविधानिक पद विसरून भोसलेंना जाहीर मुजरा केला. देवेंद्र फडणवीसांनी मुजरा केला नाही पण उदयनराजेंना उद्द्येशून थेट सांगितलं की ‘‘छत्रपतींनी आदेश द्यायचा,’’ या दोन्ही कृतींवर सडकून टीका करणारा लोकसत्ताचा अग्रलेख सर्व लोकशाहीप्रेमींनी वाचावा असा आहे. आजचा निवडक अग्रलेख तोच. कुबेरांनी घेतलेली हजेरी रास्त आहे. फक्त यातली गंमतीची बाब अशी की फडणवीस असोत की चंद्रकांत पाटील, शरद पवार असोत की राज ठाकरे, हे सगळे मुरलेले राजकारणी आहेत. आपल्या कृतीचे किंवा वक्तव्याचे काय परिणाम होणार आहेत याचा त्यांना पुरेपूर अंदाज असतो. किंबहुना इच्छित परिणाम साधण्यासाठीच ते अशी वक्तव्ये करत असतात. अर्थात कुबेरांना हे ठाऊक नाही असे नाही. पण अग्रलेखाच्या उत्तरार्धात त्यांनी या कृतीमागील राजकारणाची दखल घेतली असती तर हा लेख अजून खुलला असता, असं मला वाटतं. :) दैनिक लोकसत्ता, संपादक- गिरीश कुबेर *** आजचे अन्य अग्रलेख सामना - पळपुटे कोण ? https://bit.ly/2kAMffH तरुण भारत बेळगाव -स्नूकर-बिलियर्ड्सचा ‘सेनापती’ https://bit.ly/2mjyzWP पुढारी - गोंधळलेला पाकिस्तान हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
लोकसत्ता , निवडक अग्रलेख , मुक्तस्त्रोत
प्रतिक्रिया
निवडक अग्रलेख - १७ सप्टेंबर २०१९
पुनश्च
सुधन्वा कुलकर्णी
2019-09-17 09:30:54

वाचण्यासारखे अजून काही ...

काँगो - उत्तरार्ध
पां. वा. गाडगीळ | 4 दिवसांपूर्वी
आणि बेल्जियमचें सैन्य अजूनहि कांगोंत तळ देऊन बसले आहे.
काँगो - पूर्वार्ध
पां. वा. गाडगीळ | 7 दिवसांपूर्वी
गोरे सशस्त्र लोक दिसले की, कांगोतील काळे अडाणी लोक घरेदारे सोडून पळून जात असत
उर्दू रंगभूमि - भाग तिसरा
सेतूमाधवराव पगडी | 2 आठवड्या पूर्वी
इस्मत चुगताईचें 'धानी बांकें' जातीय ऐक्याच्या विषयावर रचलें आहे.
उर्दू रंगभूमि - भाग दुसरा
सेतूमाधवराव पगडी | 2 आठवड्या पूर्वी
पारशी नाटककारांनंतर पहिल्या उर्दूभाषी नाटककाराचें नांव रौनक़ बनारसी होय.
उर्दू रंगभूमि - भाग पहिला
सेतूमाधवराव पगडी | 3 आठवड्या पूर्वी
वाजिदअलीशहा हा स्वतः उत्तमपैकीं कवि होता.