संत सांगतात, यशस्वी कसे व्हावे...


दत्तप्रसाद दाभोळकर हा उत्साहाचा एक अखंड धबधबा आहे आणि या एकाच व्यक्तीत अनेक व्यक्तिमत्वे दडलेली आहेत. खरे तर ते संशोधक, परंतु ते वैचारिक लिखाणही करतात. वैचारिक लिखाणांना आपल्याकडे गांभीर्याचा म्हणजे ‘लांब चेहरा करुन’ ऐकवण्याचा शाप असतो, तसा तो दाभोळकरांच्या लिखाणाला नाही. म्हणूनच ते एकीकडे विज्ञान-संशोधन यावर लिहित असतानाच संतांच्या लिखाणात ठासून भरलेले लौकीक जगण्यातले अध्यात्मही त्यांना साद घालते. वरवर पाहता संत मंडळी भक्तीचा मार्ग दाखवतात असे वाटते, परंतु जरा विचार केला तर ते आपल्या अभंगांमधून यशस्वी होण्याचा मंत्र देत असतात. कसा? तो दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या  या लेखातून दिसून येते. मूळ लेख ‘कालनिर्णय’मध्ये आलेला आहे. जाता जाता एक जरा गंमतीची गोष्ट. दाभोळकर ही एकूण दहा भावंडं. त्यातली नरेंद्र आणि देवदत्त ही भावंडं ‘दाभोलकर’ असं आडनाव लावंत. हा ‘ळ’ फरक कसा आणि का आहे, ते मात्र माहिती नाही. ********** नाथांच्या घरी (मूळ शीर्षक) अंक - निवडक कालनिर्णय ‘अनुभव ही एक फणी आहे. पण टक्कल पडल्याखेरीज निसर्ग ती माणसाच्या हातात देत नाही.’ परवा कुठेतरी मी हे वाक्य वाचले आणि नकळत मला माझे बालपण आठवले. माझ्या वडिलांचा संतसाहित्यावर आणि संतांच्या आयुष्यावर दांडगा विश्र्वास. माझ्याकडून पुनःपुन्हा ते हे साहित्य वाचून घ्यायचे. उठता-बसता त्यातले दाखले द्यावयाचे. त्यांचे नेहमी आपले एक पालुपद – ‘तुला आयुष्यात यशस्वी व्हावयाचे असेल तर ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’ म्हणून हे संत-साहित्य आयुष्यभर बरोबर ठेव. अरे ही ब्रह्मगाठ आहे. आयुष्यात अपयश कधी चुकूनही तुझ्या वाटेला फिरकणार नाही. त्या वेळी वडिलांचे हे म्हणणे ऐकून मला मनातल्या म ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


कालनिर्णय , चिंतन , दत्तप्रसाद दाभोळकर , पुनश्च

प्रतिक्रिया

  1. babankhaladkar@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    Ati sundar lekh

  2. atmaram-jagdale

      5 वर्षांपूर्वी

    संतांचे अनुभवांचे बोल आहेत . ते वाया जाणार नाहीत जीवन नवनीत तोच आपला वारसाही आहे . अर्थात लेख इतका ... अधिक पहा

  3. arush

      6 वर्षांपूर्वी

    खूप मस्त



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen