गोष्ट एका हमालाची, आणि...

पुनश्च    विलास पाटील    2019-11-02 06:00:12   

ही केवळ एका हमालाची गोष्ट नाही. ही आहे माणूस नामक प्राण्याची कथा. भैरुरतन दमानी पुरस्कारासाठी उत्तम पुुस्तकाच्या शोधात असलेल्या प्रा. विलास पाटील यांना एका हमालाची आत्मचरित्रवजा गोष्ट सांगणारं पुस्तक हाती लागलं. हमालाचं ते साध सरळ आत्मकथन त्यांना आवडलं, त्या हमालाला उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा पुरस्कार मिळाला...आणि! आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात हा 'आणि' अत्यंत महत्वाचा आहे. यश असो, अपयश असो, त्या पाठोपाठ हा 'आणि' येतो आणि तो पुढील काळात निर्णायक ठरतो. 'कसा' तो वाचा या लेखात. ********** सोलापूरात राहत होतो तेव्हाची गोष्ट. भैरुरतन दमाणी साहित्य पुरस्कार समितीचा सदस्य होतो. पुरस्कारासाठी योग्य अशा पुस्तकांचा शोध सुरू असायचा. नामवंत, विख्यात अशा साहित्यिकांची पुस्तकं शोधण्यापेक्षा जनसामान्यातला कुणी एखादा काही वेगळं, विलक्षण लिहितो का, आपल्या सा-या पूर्वकल्पनांना हादरा देऊन जीवनातील वास्तवाचा एखादा वेगळाच पापुद्रा काढून काही विलक्षण जीवनदर्शन घडवतो का, याचा सातत्याने शोध सुरू होता. कल्पनांची जाळी विणून ती नटवून, थटवून मांडायची आणि एखादं पुस्तक वाचकांपुढे आणायचं किंवा लेखनाची धाटणी असल्यामुळे आपल्या नेहमीच्याच सरधोपट अनुभवांचं थोडंसं नाजूक नक्षीकाम करून ते मांडायचं, की झालं पुस्तक तयार, अशा लेखनाचा उबग आला होता. काही वेगळं हाताशी गवसत नव्हतं आणि अशा मनःस्थितीत एक पुस्तक हाती लागलं – वेगळं, सर्वस्वी वेगळं. जीवनातल्या एका वेगळ्याच स्तराचं चित्रण करणारं ते एक आत्मचरित्र होतं. भान विसरून मी ते वाचत राहिलो. झपाटल्यागत अवस्था झाली होती. अहमदनगरचा एक हमाल. आप्पा कोरपे हे त्याचं नाव ! पुस्तक होतं, ‘मी तो हमाल’. विलक्षण जीवनानुभव त्या पुस्तकातून साकार झालेला होता. त ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


विलास पाटील , पुनश्च , अनुभव कथन

प्रतिक्रिया

  1. asmitaphadke

      5 वर्षांपूर्वी

    very nice article. Really amazing to see what success does to people !!!

  2. arush

      6 वर्षांपूर्वी

    नितांत सुंदर

  3. purnanand

      6 वर्षांपूर्वी

    अप्रतिम शब्दांकन ,अशिक्षित हमालाची वर्णनाची नैसर्गिक हातोटी कौतुकास्पद ! विलक्षण गरिबीत ज्याने दिवस काढलेत, जे अनुभव घेतलेत त्याची प्रतिक्रिया अशीच असणार.त्याचे काही चुकले आहे असे वाटत नाही.अलुर्करांचे निरीक्षणहि कौतुकास्पदच. पुस्तक वाचनीयच असणार यात वादच नाही.फक्त पाटील सरांनी जाताजाता पुस्तकाचा प्रकाशक ,किंमत, प्रकाशन साल आणि पुस्तक बाजारात उपलब्द आहे किवा नाही हे सांगितले असते तर बरे झाले असते.

  4. Meenalogale

      6 वर्षांपूर्वी

    लेख आवडला.

  5. ajitpatankar

      6 वर्षांपूर्वी

    वाह.. अप्रतिम कहाणी... विलास पाटील यांचे ओघवत्या भाषेतील लेखन मस्तच.. आलूरकरांचे निरीक्षणही अफलातून.. आप्पा कोरपे यांच्या बाबत म्हणावेसे वाटते की ते एक अस्सल माणूस आहेत.. ते “हिरो” नाहीत.. सदा सर्वकाळ “आदर्श” असणारे.. माणसातील गुणावगुणांनीच “माणूस” बनतो.. अन्यथा तो “देव” बनतो आणि त्याला चुका करायची परवानगी नसते.. पुस्तक वाचायला हवे..



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen