गेला आठवडा निवडणुकांनी व्यापलेला होता. प्रचाराची समाप्ती, मतदानाचे आवाहन, मग मतदानाचा घसरलेला टक्का, मग निकालांचे अंदाज आणि शेवटी निकालांचे अर्थ अशा सर्व मुद्द्यांनी वर्तमानपत्रांचे अग्रलेख भरून वाहिले. पैकी निकालांच्या दुसऱ्या दिवशीच्या प्रत्येक अग्रलेखात विश्लेषणाखेरीज अन्य विषय नव्हता. त्यामुळे यंदा बघूया विविध अग्रलेख काय म्हणताहेत महाराष्ट्राच्या निकालांवर. ********** गेली पाच वर्षे राज्यात महायुतीची सत्ता होती. या सत्ताकाळात महायुतीच्या सरकारने विकासाची जी प्रचंड कामे केली, ती लक्षात घेत मतदारांनी पुढल्या पाच वर्षांसाठी महायुतीला कौल देतानाच जनादेशाचा सन्मान राखण्याचा इशाराही दिला आहे. गेल्या वेळी वेगवेगळे लढूनही भाजपाला 122 तर शिवसेनेला 63 जागा जिंकता आल्या होत्या. यावेळी त्यापेक्षाही जास्त जागा मिळतील, अशी दोन्ही पक्षांना अपेक्षा होती, मतदानोत्तर चाचण्यांनीही तसे संकेत दिले होते. भाजपानेही अब की बार 220 पार, असा नारा दिला होता. तो कशाच्या आधारावर दिला होता, हे कळत असले तरी वळले नाही, हे स्पष्ट झाले आहे. पाच वर्षे राज्यात सत्तेत राहिलेल्या महायुतीला दोनशेपेक्षा जास्त जागा मिळाल्या असत्या, तर तो एक विक्रमच झाला असता. पण, तसे घडले नाही. ते का घडले नाही, याचा शोध महायुतीतल्या पक्षांना घ्यावाच लागणार आहे. थोडक्यात काय, तर जो विजय मिळाला आहे, जनतेने जो कौल दिला आहे, त्याबाबत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला आत्मिंचतन करावे लागणार आहे. या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मतदारांनी दलबदलूंना शिकविलेला धडा! काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून भाजपा-शिवसेनेत आलेल्या 35 पैकी 19 नेत्यांना मतदारांनी पराभूत करून भविष्यात कसा कल राहील, याचेही स्पष्ट संकेत दिले आहेत. सगळ्यात मोठा ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
vilasrose
6 वर्षांपूर्वीनवीन स्वरूप आवडले.