हिंदुस्थानांतील नवे धर्मपंथ

पुनश्च    संकलन    2019-11-29 06:00:34   

इंग्रजांचे राज्य हिंदुस्थानांत स्थापन झाले तेव्हा त्यांनी इंग्रजी शिक्षण सुरू केले, आपल्या चालीरीती श्रेष्ठ आहेत व आपला धर्म मोठा आहे असे ते भासवूं लागले. ख्रिस्ती लोकांनी रविवारी सुंदर वेष करावा आणि गावांतील देवळात (Church) प्रार्थनेला जावे हे दृश्य हिंदी लोकांना मोठे रमणीय वाटे. परकीयांच्या संगतीने आपल्या धर्माची पहाणी करावी, चिकित्सा करावी अशी वृत्ती हिंदुंमध्ये उत्पन्न झाली. अनेक धर्मसुधारक निघाले. या धर्मसुधारकांनी धर्मभावनेची प्रचंड लाट निर्माण केली. राजा राममोहन राय, श्री रामकृष्ण परमहंस,  देवेन्द्रनाथ टागोर, स्वामी विवेकानंद, स्वामी रामतीर्थ, दयानंद सरस्वती, डॉ. अनी बेझंट यांची नांवे कोणास ठाऊक नाहीत? या सगळ्याची सुरुवात कशी झाली, का झाली त्याची प्रस्तावना आजच्या लेखात आहे. या विभूतींनी स्थापन केलेल्या विविध पथांचा इतिहास आणि कार्य आपण याच मालिकेतील पुढील लेखांमध्ये पाहणार आहोत. तब्बल ८२ वर्षांपूर्वी, आनंद या मासिकात प्रसिद्ध झालेली हा लेखमाला म्हणजे इतिहासाचा मोठाच ऐवज आहे. अंक – आनंद, फेब्रुवारी १९३७ ज्ञानसागरावरील सफरी-१ (मूळ शीर्षक)

गेल्या शंभर वर्षांतील एकंदर चळवळींचे सर्व बाजूंनी निरीक्षण करावयाचे ठरविले तर धर्मविषयक चळवळींना मोठेच स्थान द्यावे लागेल. इंग्रजांचे राज्य हिंदुस्थानांत स्थापन झाले तेव्हा त्यांनी फक्त यंत्रेच हिंदुस्थानांत आणली असे नाही. त्यांनी आपली राज्यपद्धती इकडे आणली, त्यांनी इंग्रजी शिक्षण सुरू केले, आपल्या चालीरीती श्रेष्ठ आहेत व आपला धर्म मोठा आहे असे ते भासवूं लागले. थोडक्यांत म्हणजे इंग्रजांनी आपल्या राज्याची घडी बसली असे पाहतांच आपली ‘संस्कृती’ पसरविण्यास सुरुवात केली.

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


इतिहास , समाजकारण , दीर्घा , आनंद

प्रतिक्रिया

  1. sudhir.belhe

      6 वर्षांपूर्वी

    छान लेख.घराची उपमा एकदम चपखल.लेखमालेतील पुढील लेखांची उत्कंठा लागली आहे.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen