fbpx

वाह रे ‘आरे’!

पाण्यापेक्षाही दूधाची उपलब्धता सहज झालेल्या आजच्या काळात महाराष्ट्रात एकेकाळी सकाळी सकाळी रांगा लावून दूधाच्या बाटल्या घ्याव्या लागत होत्या हे माहिती असण्याची शक्यता नाही. त्यातही चहावाले, उपाहारगृहे यांना दूधाच्या भूकटीऐवजी ताजे दूध वापरायचे असेल तर वेगळा परवाना घ्यावा लागत असे आणि तो सहजी मिळत नसे हे तर आज अशक्यप्रायच वाटते. गेल्या साठ-सत्तर वर्षात झालेल्या अनेक गोष्टींकडे कानाडोळा करताना अती परिचयात अवज्ञा होऊन अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते, दूधाची उपलब्धता ही त्यातली एक महत्वाची बाब आहे. आज आरे हा शब्द वेगळ्या कारणांनी चर्चेत असला तरी एकेकाळी आरे आणि दूध हे शब्द एकत्र उच्चारले जात होते. ‘आरे’ने दूध गोळा करुन त्याचा मुंबई शहराला पुरवठा करण्याचा प्रकल्प १९५२साली सुरु केला तो देशातील धवलक्रांतीचा पहिला टप्पा होता. महाराष्ट्राच्या निर्मितीच्या आधी मुंबईच्या मंत्रिमंडळात दिनकरभाई देसाई हे कायदा व शिक्षण ही दोन खाती सांभाळत होते. परंतु दूध या विषयांचा त्यांचा अभ्यास होता त्यामुळे ‘आरे’ची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती. ‘आरे’ विषयी तेंव्हा त्यांची ही मुलाखत सह्याद्री साप्ताहिकात १९५३ साली प्रसिद्ध झाली होती. ती वाचताना आपण कुठून कुठे आलो ते लक्षात येते. सत्तर-ऐंशाच्या दशकात प्रसिद्ध असलेली ‘वाह रे आरे’ ही ओळ किती समर्पक होती तेही यातून स्पष्ट होते.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'पुनश्च' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'पुनश्च' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 2 Comments

  1. बाप रे
    किती इतिहास मोठा आहे दुधाचा

  2. फारच रंजक. विकास होताना पर्यावरण ढासळते परंतु लाखोंची आयुष्येच कायमची बदलून जातात. हे सगळं माणसाच्या कर्तृत्वाची वाचताना कमाल वाटते!

Leave a Reply

Close Menu