परधर्मीयांचे व धर्मभ्रष्टांचे हिंदूकरण

पुनश्च    अ.स. आळतेकर    2019-12-18 06:00:13   

बहात्तर वर्षांपूर्वी हा लेख प्रसिद्ध झाला, तेंव्हा तो लिहिण्यासाठी निमित्त झाले होते बंगालमध्ये मुसलमानांनी बळजबरीने बाटवलेल्या हिंदूंना परत धर्मात प्रवेश द्यावा अथवा नाही याबाबतच्या वादाचे. परंतु या वादाच्या निमित्ताने डॉ. अ.स. आळतेकर ( बनारस हिंदू युनिव्हर्सिटी) यांनी इसविसनाच्या आधीपासून हिंदूंनी केलेली इतरांची धर्मांतरे, इतर धर्मांत गेलेल्यांना परत हिंदू करण्याबाबतचे वेगवेगळे मतप्रवाह आणि हिंदू-मुस्लिम धर्मांतराचा इतिहास याचा अतिशय अभ्यासपूर्ण आढावा घेतला आहे. हिंदू धर्मात पुन्हा प्रवेश देण्याबाबत छत्रपती शिवाजी महाराजांचा विशाल दृष्टिकोन आणि पेशव्यांचा संकुचित विचार यावरही नेमके बोट ठेवले आहे. धर्माभिमानाच्या पलिकडे जाऊन आपण हा इतिहास पाहिला तर धर्माबाबतची कट्टरता लोप पाऊन आपणही नक्कीच सहिष्णू होऊ शकतो. डॉ. अनंत सदाशिव आळतेकर (३० ऑगस्ट १८९८ ते २५ नोव्हेंबर १९५९) प्राचीन भारतीय इतिहासाचे जागतिक कीर्तीचे संशोधक. त्यांनी आपले बहुतांश लिखाण इंग्रजीत केल्याने महाराष्ट्राला त्यांचा आणि त्यांच्या थोरवीचा परिचय फार उशीरा झाला. प्राचीन ‘भारतीय शिक्षण पद्धती’, 'शिलाहारांचा इतिहास', 'काशी-प्राचीन व अर्वाचीन' हे त्यांचे ग्रंथ मराठीत अनुवादित झाले. बनारस हिंदु विद्यापीठाने त्यांना प्राध्यापक म्हणून खास आमंत्रित केले होते. १९४९ साली पाटणा विद्यापीठानेही त्यांना इतिहास विभागाच्या स्थापनेसाठी सन्मानाने बोलावून घेतले होते. अमेरिका, प.जर्मनी येथे ते अनेकदा भारतीय प्राचीन संस्कृतीचा इतिहास शिकवण्यासाठी आमंत्रित म्हणून गेले होते. ********** ऑक्टोबर-नोव्हेंबर १९४६ मध्ये बंगालमध्ये हजारो हिंदूंना बलात्काराने मुसलमान धर्माची दीक्षा दिल्याची जेव्हा बातमी आली, तेव्हा हिंदु सम ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


इतिहास , सह्याद्री , समाजकारण

प्रतिक्रिया

  1. Apjavkhedkar

      5 वर्षांपूर्वी

    या विषयावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या सहा सोनेरी पाने या पुस्तकाची आठवण होते.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen