शाहीर अनंत फंदी-एक रसभरीत ताळेबंद

पुनश्च    संकलन    2019-12-14 06:00:14   

अनंत फंदी  (१७४४ - १८१९) हे उत्तर पेशवाईत गाजलेल्या शाहिरांतील सर्वांत जेष्ठ शाहीर.  ‘‘फंदी अनंतकवनांचा सागर’’ आणि ‘‘समोर गातां कोणि टिकेना’’ असा होनाजी बाळांनी त्यांचा गौरव केला होता. पदे, लावण्या, कटाव, फटके इ. विविध प्रकारच्या रसाळ व प्रासादिक  रचना  त्यांनी केल्या आहेत. दुसऱ्या बाजीरावांची प्रथम याच्यावर मर्जी होती, तथापि पुढे त्यांचे बिनसले होते असे म्हणतात.  अनंत फंदी यांच्या आयुष्याचा हा रसभरीत ताळेबंद, ६२ वर्षांपूर्वीच्या म्हणजे १९५८च्या दीपमाला'मधून- ...................... अंक – दीपमाला, नोव्हेंबर १९५८ धोंड्याने बुद्धि वळणावर शाहीर-कवि अनंत फंदी यांचा जन्म इ.सन १७४४ मध्ये संगमनेर (जिल्हा- अहमदनगर) येथे झाला. लहानपणी ते उनाड व खोडकर होते. त्यांचे वडील लवकरच मयत झाल्यामुळे व त्यांना भाऊ, बहीण वगैरे कोणीच नसल्यामुळे ते आईचे फार लाडके होते. शाळेतल्या अभ्यासाकडे त्यांचे लक्ष नव्हते. दिवसभर ते उनाडक्या करीत व आईचे मुळीच ऐकत नसत. संगमनेरात त्यावेळी एक भवानीबुवा नावाचे संतपुरुष होते. त्यांच्या मठांत अनंत फंदी जाऊन बसावयाचे व त्या गावांत फक्त त्यांनाच तेवढे मानायचे. एके दिवशी ते आपल्या आईवर खूप रागावले व भवानीबुवांच्या मठांत जाऊन राहिले. सकाळ झाल्यावर त्यांचा शोध करीत आई मठांत आली. मुलगा तेथे बसलेला पाहून ती त्यांची गाऱ्हाणी भवानीबुवांना सांगू लागली. फंदीवर बुवा फार रागावले व त्यांनी फंदींना एक धोंडा फेकून मारला व मठांतून निघून जाण्यास सांगितले. बुबांचा धोंडा अंगावर बसताच फंदींची बुद्धी वळणावर आली व ते कविता करायला लागले. लवकरच त्यांनी पोवाडे व लावण्या रचायला सुरुवात केली व काही साथीदार जमवून तमाशाचा फड उभा केला. घोल ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


कला रसास्वाद , व्यक्ती विशेष , दीपमाला

प्रतिक्रिया

 1. atmaram-jagdale

    2 वर्षांपूर्वी

  चांगला लेख आहे .

 2. [email protected]

    2 वर्षांपूर्वी

  Chan

 3. patankarsushama

    2 वर्षांपूर्वी

  छान

 4. shripad

    2 वर्षांपूर्वी

  छान!वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen