fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

भागवतांचं घरश्रीपु भागवत, मौज आणि सत्यकथा यावर खूप  लिहून, वाचून झाले आहे. परंतु प्रस्तुत लेखात दिसणारे श्रीपु फार क्वचित कुणाला दिसले असतील. आपण वाचलेले बहुतांश लेख ‘श्रीपु भक्ती’ किंवा ‘श्रीपु आदर’ या भावनेतून लिहिले गेलेले होते. मौज, दिवाळी  २००८ च्या अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख मात्र श्रीपुंचा शेजार,  जिव्हाळा आणि माया लाभलेल्या लता काटदरे यांनी त्या स्नेहातून लिहिलेला आहे. यात साहित्यिक डोकावतात ते केवळ श्रीपुंच्या घरी येण्यापुरते. बाकी सर्व लेख भरुन उरतात ते ‘कौटुंबिक श्रीपु’ जे आपल्याला फार माहितीच नाहीत. लता काटदरे यांच्या लेखणीतली सहजता आणि घटना सांगताना कोणताही आव न आणता, शब्दांचा फुलोरा न सजवता सांगण्याची शैली यामुळे हा संबंध लेख म्हणजे जणू एक भावनिक चित्रपट झाला आहे.

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 9 Comments

 1. अप्रतिम

 2. Thank you for such a nice article

 3. अनुभव पूर्णपणे वैयक्तिक असूनही खूप भावले . आपल्या घरातलीच वरिष्ठ व प्रिय व्यक्ती गेल्या नंतर उमाळून आठवणी येत रहाव्यात तसं लताताईंना झालं असणार आणि हा लेख त्याचा परिपाक वाटतो . शाळेत असताना मी श्रीपुंना प्रा न र फाटक ह्यांच्या कडे आलेलं पाहीलं आहे . अत्यंत सुसंस्कृत आणि सोज्वळ व्यक्तीमत्व .

 4. फार दिवसांनी काहीतरी विलक्षण अनुभव देणारं वाचायला मिळालं. आम्ही सामान्य माणसं पण यात अद्वैत, श्रीपु व विमलताई यांचा सारखंच नातं आम्ही दोघे व आमच्या शेजारच्या युवराज वय वर्ष ४ अनुभवत आहोत म्हणुन लेख अत्यंत जवळचा वाटला.

 5. लेख अप्रतिम सुंदर आहे.
  मी माझ्या बालपणी अकोल्याला श्री पु भागवत यांना माझ्या आजोबांच्या घरी ते उतरले होते तेव्हा पाहिल होत. समवेत विद्या बाळ पण होत्या. त्या ही आता नाहीत. मी काय शिकतोय वगैरे जुजबी चौकशी दोघांनीही सहज गप्पा करत केली मला छंद कोणता तर मी म्हणालो वाचन. यावर दोघांनीही प्रसन्नता व्यक्त केली. अरे वा काय वाचतोय सध्या
  विचारल. त्या नकळत्या वयातही ही कुणी वेगळी अन मोठी माणसे आहेत हे मला जाणवलं होता. आता मजजवळ फक्त बालपणीची एक चांगली आठवण उरलीय.

 6. एकाच वेळी विविध भावनांचा कल्लोळ झाला आहे मनात. अप्रतिम! सलाम लताताईंना – अक्षरशः चित्रपट पाहत असल्याची अनुभूती आली.

 7. भारावून गेलो..

 8. खूप सुंदर लेख.श्रीपु यांचे कौटुंबिक भावबंध छान उलगडून दाखवले आहेत.भागवतांचा सहवास लाभला ही भाग्यची बाब आहे.

 9. सुरेख!

Leave a Reply

Close Menu