श्री शिवरायांची विविध चित्रें


अंक – श्रीसरस्वती, श्रीशिवराज विशेषांक, १९६१ आपल्याकडे पुष्कळ घरांतून श्रीशिवाजीमहाराजांचे घोड्यावर बसलेले मोठ्या आकाराचे रंगीत चित्र आढळते ते राजा रविवर्म्याचे होय. काही युरोपियन ग्रंथांतून ऑर्म नांवाच्या इतिहासकाराने दिलेले आणि युरोपांतून मिळविलेले श्रीशिवाजीराजांचे चित्र प्रमाण धरून आणि त्या चित्रांतील चेहऱ्याची ठेवण जुळती ठेवून, आपल्या कल्पनेची भर घालून चित्रे तयार करून प्रसुत केली आहेत. पुढे श्रीशिवाजीमहाराजांच्या चरित्राकडे लक्ष अधिकाधिक लागत गेले. त्यांच्याविषयींची भक्ती वाढत गेली तशी छत्रपतींची अनेक चित्रे लोकांपुढे आली. श्रीशिवाजीमहाराजांचे संपूर्ण चरित्र चित्रमय करून छापण्याची कल्पना मनांत आल्यावर स्वतः चित्रकार असलेले देशभक्त राजसाहेब बाळासाहेब औंधकर प्रतिनिधी यांनी तसा प्रयत्न केल्याचे प्रसिद्ध आहे. अर्थात चेहऱ्याची ठेवण सोडून दिली तरी सर्व चित्रे काल्पनिक आहेत. अलीकडे शिवाजीमहाराजांचे पुतळे जागजागी उभारण्यांत येत आहेत. त्यांची तैलचित्रेही लावण्यांत येत आहेत. यापुढे चित्रकार आणि मूर्तिकार यांना शिवाजीच्या खऱ्या विश्र्वसनीय चित्राची आणि वर्णनाची गरज पडते व कित्येक चोखंदळ कलावन्त त्यासंबंधाने माहिती मिळविण्याचा प्रयत्न करीतात. तथापि, त्या सर्वांचीच पोंच विश्र्वसनीय साधनांपावेतो होतेच असे नाही. साधने विश्र्वसनीय कोणती आणि अविश्र्वसनीय कोणती याचा बारकावा त्यांना सहाजिकच अवगत नसतो आणि त्यामुळे ज्ञान आणि अज्ञान याचाही विवेक त्यांच्याकडून होत नाही. 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


इतिहास , प्रासंगिक , श्री सरस्वती

प्रतिक्रिया

 1. hemant.a.marathe@gmail.com

    12 महिन्यांपूर्वी

  प्रस्तुत लेखामध्ये शिवाजी असा उल्लेख कुठेही खटकत नाही कारण राजा हा रयतेचा असतो व रयतेला तो आपल्या घरातीलच वाटतो. आम्ही लहानपणी शिवाजी म्हणतो हा खेळ खेळत असू, तेव्हा आम्ही काही त्यांचा अपमान करत नव्हतो. त्याकाळी ती पध्दत होती, तेव्हा उगीच मूळ लेखात बदल करून त्यात विसंगती आणणे योग्य ठरणार नाही

 2. ratnakarkulkarni

    2 वर्षांपूर्वी

  आई ला आपण एकेरी उल्लेख करतो म्हणून अनादर होत नाही. उगीचच कोणत्याही गोष्टी भावनिक बनवू नयेत. शाळेत शिवाजी राजाविषयी सर्व उल्लेख एकेरी आहेत पण त्यामुळे अवमान होतोय अस वाटलं नाही.

 3. सुधन्वा कुलकर्णी

    2 वर्षांपूर्वी

  मूळ लेखांत कुठलेही बदल न करता आपण ते प्रसिद्ध करीत असतो. सेतू माधवराव पगडी ते गोविंद पानसरे असे अनेक जुने लेखक आणि इतिहासकार महाराजांचा उल्लेख शिवाजी असा एकेरीत करतात, त्यात त्यांचा उपमर्द करणे हा हेतू असूच शकत नाही. जसे विठ्ठलाला प्रेमाने एकेरीने संबोधले जाते तसेच महाराजांनाही. त्यामुळे आपण वाचकांनीही त्यात गैर मानून घेण्याचे कारण नाही. कोल्हापूरची ' शिवाजी ' युनिव्हर्सिटी किंवा मुंबईचे 'शिवाजी' पार्क, यात महाराज असा आदरार्थी उल्लेख नसल्याने आजवर शिवाजी महाराजांचा कधी अपमान झाला नाही. तर या लेखाने कसा होईल ?

 4. ajitbmunj

    2 वर्षांपूर्वी

  शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख खूप खटकतो, तो  काढून "शिवाजी महाराज" असा आदरार्थी उल्लेख करुंन लेख पुन्हा प्रसिद्ध करा.वाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.