आणि तरीही शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे!

अंक : रोहिणी, जुलै १९५१

नावात काय आहे, असं शेक्सपिअर एकदा लिहून गेला, त्यानंतर या वाक्याचा आधार घेऊन नाममहात्म्यावर आजवर शेकडो लेख आले असतील. या वाक्याला वेठीला धरुन विनोद करण्याची परंपरा फार जुनी आहे. त्या त्या काळानुसार विनोदाची जातकुळी बदलते, परंतु शेक्सपिअरच्या वाक्याचं उदाहरण कायम राहतं. हा लेख वाचून आपल्याला पन्नासच्या दशकातील सर्वसामान्य विनोदाच्या जातकुळीचा एक मसला मिळतो. पण या लेखाची आणखी एक गंमत आहे. १९५१ साली प्रथम प्रसिद्ध झालेल्या या लेखात ‘लोकसत्ता’ या वृत्तपत्रातील शब्दकोड्यांचा आणि ते सोडवून मिळणाऱ्या बक्षिसाचा उल्लेख आहे. शब्दकोडे तेंव्हा नुकतेच सुरु झाले होते, ते पूर्णपणे बरोबर सोडविणाऱ्यांना रोख बक्षिसेही दिली जात. मुख्य म्हणजे  लोकसत्तामध्ये या कोड्यांची जबाबदारी तेंव्हा जयवंतराव साळगावकर यांच्याकडे होती. या शब्दकोड्याच्या यशातूनच त्यांना आत्मविश्वास प्राप्त झाला आणि त्यातून पुढे ‘कालनिर्णय’चा उद्योग उभा राहिला…

**********

शेक्सपिअर कितीही उत्कृष्ट नाटककार वा कवी असला व मानसशास्त्र जाणणारा कुशल कलावन्त म्हणून त्याला मानले तरीही नावाचं मानसशास्त्र त्याला समजलं नव्हतं असंच मी म्हणेन. नाहीतर ‘नावांत काय आहे?’ असं त्यानं म्हटलंच नसतं.

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 5 Comments

 1. maxianton64@gmail.com

  छान

 2. sugandhadeodhar

  “नावात काय आहे?”
  अजरामर सुभाषित!

 3. atmaram-jagdale

  हलका फुलका लेख आहे .

 4. Kantilal-Oswal

  छान…

 5. smmohite.hr@outlook.com

  सुंदर लेख आहे

Leave a Reply