अंक : मंथन जुलै १९५५ रीडर्स डायजेस्ट माहिती नाही असा वाचक विरळाच. पुनश्चच्या कल्पनेवर रीडर्स डायजेस्टचा प्रभाव आहे. मराठीत त्यापासूनच स्फूर्ती घेऊन 'मंथन', 'नवनीत', 'अमृत', 'विचित्रविश्व' अशी बरीच मासिके डायजेस्ट या स्वरूपात निघाली होती. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ती वाचली असतीलच. पण या रीडर्स डायजेस्टचा जनक कोण असं विचारलं तर मात्र बरेच जण गप्प राहतील. आणि मनातल्या मनात स्वतःला कोसतील. 'एव्हढा वाचक म्हणवतोस पण याचं उत्तर माहिती नाही?' पण चूक त्यांची नाही. काही लोकांचं कामच असं असतं की तेच लोकांच्या लक्षात राहातं. रेड क्रॉसचे संस्थापक तरी कुठे आपल्याला माहिती आहेत? पण ही उदाहरणं विरळीच. सध्याच्या आपल्या आजूबाजूच्या फ्लेक्सबाजीच्या गोंधळात उठून दिसणारी... **** उत्तर अमेरिकेतील मिनेसोटा प्रांतातील सेंट पॉल गावी १२ नोव्हेंबर १८८९ रोजी डेवीट वॉलेसचा जन्म झाला. कॅलिफोर्निया विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर त्याने लागलीच एका प्रकाशन संस्थेत नोकरी धरली. शालेय पुस्तके प्रकाशित करणारी ती संस्था होती. तेथेच त्याला वाचनाचा नाद लागला. हाती येईल ते पुस्तक वाचण्याचा त्याने सपाटा चालविला. सर्व जगातील विविध क्षेत्रातील घडामोडी समजण्यासाठी खूपच पुस्तके वाचावी लागतात, त्याऐवजी सारांश रूपाने एकाच पुस्तकात सर्व मजकूर छापला तर मोठीच सोय होईल, ही कल्पना वॉलेसला त्यावेळी सुचली, आणि त्याच्या डोक्यात कायमचे ठाण मांडून बसली. त्याच सुमारास पहिले महायुद्ध सुरू झाले आणि वॉलेसला आपली सर्व मनोराज्ये गुंडाळून अमेरिकेच्या पायदळात सामील व्हावे लागले. युरोपच्या रणांगणात तो लढला. फ्रान्समधील व्हर्डून येथील एका चकमकीत तो जखमी झाला. त्यामु ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
shripad
5 वर्षांपूर्वीआपल्याकडील अमृत मासिक, जे आता दुर्दैवाने बंद पडले आहे, थोडेसे असेच होते का?
5 वर्षांपूर्वी
आपल्याकडील अमृत मासिक, जे आता दुर्दैवाने बंद पडले आहे, थोडेसे असेच होते का?
kiran bhide
8 वर्षांपूर्वीकृपया आवडलेले लेख समाजमाध्यमांवर शेअर करा जेणेकरून लोकांना ते वाचायला मिळतील. आपला उद्देश जुने चांगले लेख जास्तीतजास्त वाचकांपर्यंत पोहोचवणे हा आहे.
अमर पेठे
8 वर्षांपूर्वीछान माहिती मिळाली.
Manisha kale
8 वर्षांपूर्वीReader's digest lekh apratim.
Dhampall
8 वर्षांपूर्वीअप्रतिम खूपच छान , एखाद्या वाचकाची आवड आणि अविरत प्रयत्न वाचून ज्ञानात भर पडली. सुंदर लेख. खूप छान कलेक्शन वाचयला मिळतंय पुनःश्च वर नेहमीच , आता पुढे काय वाचायला मिळेल असे उत्सुकता लावणारे.